भुसावळ : शहरात बुधवारी संध्याकाळी सुनेने विळ्याच्या सहाय्याने सपासप वार करून सासूची हत्या केली होती. या घटनेला २४ तास होत नाही तोच विठ्ठल मंदिर वार्डातील धीरज नीलकंठ पाटील (३१)रा.विठ्ठल मंदिर वार्ड हे पंधरा बंगला भागातील महिलेला उसने दिलेले पैसे मागणी करण्यास गेले असता महिलेसह मुलाने धीरजच्या डोक्यात प्राणघातक हल्ला करत कुऱ्हाडीने वार करून जखमी केले.
धीरज पाटील याने सीता बाविस्कर या महिलेस दोन हजार रुपये उसने दिले होते. ते मागण्यासाठी गेले असता सीता बाविस्कर यांचे पती व त्यांचा मुलगा बंटी बावस्कर यांनी पैसे का मागितले? याचा राग आल्याच्या कारणावरून लोखंडी कुऱ्हाडीने धीरजच्या डोक्याच्या मध्यभागी मारून दुखापत केली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? संशयित आरोपी बंटी बाविस्कर याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पो.हे.काँ नेव्हिल बाटली करीत आहे.