शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

विराटला लवकर बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाज सर्वात माहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 21:40 IST

पल्लेकल येथील दुस:या वन डे सामन्यात धनंजयने त्याचा अवघ्या 4 धावांवर त्रिफळा उडवला

ठळक मुद्दे28 शतकांसह 54.54 च्या सरासरीने 8346 धावा लंकेच्या गोलंदाजांनी सर्वाधिक 26 वेळा त्याला पन्नाशी गाठण्याआधीच बाद केलेय18 वेळा विराटला वन-डे अर्धशतकापासून वंचित ठेवलेय

ऑनलाईन लोकमत / ललित झांबरे

जळगाव, दि. 27 - विराट कोहली सद्यस्थितीत जगातील आघाडीच्या यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. 192 वन डे सामन्यात त्याच्या नावावर 28 शतकांसह 54.54 च्या सरासरीने 8346 धावा आहेत. असे  असले तरी   विराटला लवकर बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाज सर्वात माहिर  असल्याचे दिसून आले आहे. श्रीलंकन गोलंदाजांनी ब:याचदा त्याची कोंडी केली आहे. पल्लेकल येथील दुस:या वन डे सामन्यात धनंजयने त्याचा अवघ्या 4 धावांवर त्रिफळा उडवला. तर तिस:या सामन्यात फर्नांडोने त्याला फक्त तीन धावांवर परत पाठवले.आपल्या एकुण 192 वन डे सामन्यात एकेरीच धावा करण्याच्या त्याच्या  49 खेळी आहेत आणि या 49 मध्ये सर्वाधिक 11 वेळा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी  श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्याला लवकर परत धाडले आहे. त्याला लवकर परत धाडले आहे. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी 10 वेळा आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सात वेळा त्याला दुहेरी धावात पोहचण्याआधीच बाद केलंय.आता हाच शोध आपण वन-डेमध्ये त्याच्या अर्धशतकाआधीच म्हणजे 0 ते 49 धावांदरम्यान बाद होण्याचा घेतला तर त्यातही लंकन गोलंदाजांनीच त्याला सर्वाधिक वेळा अर्धशतकाआधीच बाद केल्याचे दिसून येते. वन डे मध्ये विराटच्या 120 सामन्यातल्या 112 खेळी 50 पेक्षा कमी धावांच्या आहेत. यात लंकेच्या गोलंदाजांनी सर्वाधिक 26 वेळा त्याला पन्नाशी गाठण्याआधीच बाद केलेय. त्याखालोखाल इंग्रज गोलंदाज आहेत ज्यांनी 18 वेळा विराटला वन-डे अर्धशतकापासून वंचित ठेवलेय.एवढेच नाही तर परदेशी खेळताना श्रीलंकेतच विराटच्या अर्धशतकापेक्षा कमी असलेल्या सर्वाधिक 17 खेळी आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात तो 13 वेळा 50 च्या आधी बाद झालाय. यावरुन हे दिसून येतंय की विराटला लवकर बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाज सर्वात माहिर आहेत.