जळगाव : संपदा सोहळा नावडे मनाला, सांगता ठकडा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हो. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी
वाट पाहे. वारकरी आषाढी वारीला खान्देशातून निर्जला एकादशी ते वटसावित्री पोर्णिमेपासून पंढरीच्या पायी दिंडीच्या पालख्यांना जिल्ह्यातून प्रारंभ होत असतो. पंरतु, यंदा
कोरोनामुळे मानाच्या दहा पालख्यांना आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली असल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. विठ्ठल मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर येथून पाडुरंग परमात्मयाचा, माऊली ज्ञानेश्वराचा जल्लोष करून दिंड्या-पालख्यांना प्रारंभ होतो. अमळनेरहून संत सखाराम, जुने जळगावातून
श्रीराम मंदिरातून संत मुक्ताई राम पालखी, मुक्ताईनगर येथून मुक्ताई पालखी सोहळा तसेच विविध प्रकारच्या दिंड्या पंढरपुरच्या दिशेने निघत असतात.
चंद्रभागेच्या तिरी विटेवर उभा असलेल्या विठ्ठलाला आतुरतेने भेटीला जाण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आदी कानाकोपऱ्यातून भाविक पंढपुरात दाखल होत असतात. पंढरीची वारी म्हणजे
सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी एकत्र येण्याचे हे ठिकाण असल्याचे सतांनी सांगितले आहे. पंढरपुरची वारी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावी, यामुळे मुखाने हरिनाम कीर्तनाचा आनंद मिळतो आणि भगवान पांडुरंगाचे दर्शन घडते. तसेच मनातील द्वेश, पाप, मद, मत्सर
नष्ट होते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुधारणा होते. विचारात, मनात बदल घडत असतो. विठ्ठलाचे सगुण हे सुंदर रूप आहे. सामान्य माणसाच्या कल्याणासाठी या अभंगाची रचना
आहे. ईश्वरा जवळ संसारी माणसाची जवळीकता निर्माण करणारा हा अभंग आहे.
माणसाजवळ कितीही धनसंपदा असली, तरी सुख वाटत नाही. त्याच्या मनी पंढरीच्या वारीची तळमळ लागली की, त्याच्या मनात या पांडुरंगाला भेटण्यासाठी आर्तता लागते. त्याची चक्रपाणी वाट पाहते आणि ह्या वर्षी सुद्धा पंढरीची वारी बंद आहे. म्हणून गावातीलच मंदिरात
पांडुरंगाची भेट घ्या. `विटेवरी रे उभा विठ्ठला, डोळा भरूनी पाहिला, आज माझ्या मनी आनंद झाला.
निरूपण : ह. भ. प. गोपाळ ढाके महाराज.