शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डच्या सर्व समस्या तत्काळ सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

मुक्ताईनगर : नागरिकांच्या रेशन कार्डबाबतीत सर्व समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ...

मुक्ताईनगर : नागरिकांच्या रेशन कार्डबाबतीत सर्व समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड, आधार लिंकिंग व इतर जिल्ह्यांत आधार लिंक झालेली नावे याबाबत दुरुस्तीची कामे तातडीने होत नाहीत. पुरवठा विभाग ऑनलाइन होत नसल्याचे कारण व सदरील वेबसाइट बंद किंवा सर्व्हर जाम असल्याचे कारण देऊन, तर कधी तहसीलदारांचे थंब होत नसल्याची कारणे करून नागरिकांची रेशन कार्डसंबंधी कामे प्रलंबित ठेवत आहेत. अशा एक ना अनेक कारणांनी रेशन कार्ड बाबतीत प्रश्न कायमच प्रलंबित ठेवण्यात येत असतात. नागरिकांना अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब, केशरी कार्ड धान्यापासून वंचित राहावे लागते, तसेच इतर योजनांपासून लांब ठेवण्याचा संतापजनक प्रकार येथे सुरू असल्याने याप्रकरणी तात्काळ योग्य त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, नागरिकांचे रेशन कार्ड बाबतीत सर्व समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार पानपाटील यांनी स्वीकारले.

निवेदन देतेवेळी शहरप्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, युवा सेना तालुकाप्रमुख पंकज राणे, शकूर जमदार, जाफर अली, हारुण शेख, नगरसेवक मुकेश वानखेडे, आरीफ आझाद, सलीमखान, लीलाधर पाटील, कैलास बावणे, पप्पू मराठे, शुभम शर्मा आदी उपस्थित होते.