शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पहूरच्या शेतकऱ्याला सर्पदंश; उपचारासाठी फिरफिर झाल्याने गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

जळगाव : पहूर, ता.जामनेर येथील विनोद फकिरा चौधरी (वय ४८) या शेतकऱ्याला रविवारी शेतात फवारणी करीत असताना विषारी सापाने ...

जळगाव : पहूर, ता.जामनेर येथील विनोद फकिरा चौधरी (वय ४८) या शेतकऱ्याला रविवारी शेतात फवारणी करीत असताना विषारी सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लहान भावाने त्यांना तातडीने पहूर रुग्णालयात नेले, त्यांनी प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालय अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथे आणल्यावर डॉक्टरांनी उपचार न करता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या दोघांच्या सल्ल्यानुसार चौधरी यांची फिरवाफिरव झाली अन‌् डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना पुन्हा समोर आला. चौधरी यांना वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.

या घटनेबाबत मृत विनोद यांचे भाऊ योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोघं भाऊ शेतात फवारणीचे काम करीत असताना गवतात मोठे भाऊ विनोद यांच्या पायाला सर्पदंश झाला. पायाला काही तरी लागल्याचे त्यांनी योगेश यांना सांगितले. त्यांनी काही त्रास होतोय का म्हणून विचारणा करुन पाय बघितला असता काटा टोचल्यासारखी एक खूण दिसली. थोड्याच वेळात त्रास होऊ लागल्याने योगेश यांनी भावाला पहूर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करुन जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. तेथील सरकारी रुग्णवाहिकेतून विनोद यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना तपासून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथे पोहचण्यापूर्वीच रस्त्यात त्यांनी प्राण सोडले. तेथील डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर पुन्हा त्यांना शासकिय रुग्णालयात आणण्यात आले.

...तर प्राण वाचले असते

भाऊ विनोद यांच्यावर पहूर किंवा जळगाव शासकीय रुग्णालयात तातडीने उपचार केले असते तर माझ्या भावाचे प्राण वाचले असते, मात्र सरकारी यंत्रणेने उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देऊन उपचारास टाळाटाळ केली, असा आरोप योगेश यांनी केला. दरम्यान, शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याने येथे डॉक्टरांची कमतरता जाणवत असून रविवारी तर परिस्थिती अत्यंत बिकट असते. रविवारी सर्पदंशाचे तीन रुग्ण आले होते. विनोद यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा कुणाल, पवन, मुलगी गौरी व अक्षदा असा परिवार आहे.