शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापसाच्या बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 15:28 IST

अवकाळी पावसाने आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनावर जबर परिणाम झाल्याने मुक्ताईनगरच्या कापसाच्या खाजगी बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनावर जबर परिणामकापसाच्या खाजगी बाजारपेठेवर मंदीचे सावटतीन हजार ८०० ते पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदीयावर्षी कपाशीची पेरणी तालुक्यात २२ हजार हेक्टरवर, परंतु अवकाळी पावसाने झाले नुकसान

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : अवकाळी पावसाने आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनावर जबर परिणाम झाल्याने मुक्ताईनगरच्या कापसाच्या खाजगी बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. त्याची तुरळक आवक पाहता बाजारात प्रतवारीचे निकष लावून तीन हजार ८०० ते पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत आहे.खान्देशातील अग्रगण्य अशा या बाजारपेठेत हजारावर मजुरांच्या हाताला काम मिळायचे आणि व्यापार कोटीच्या घरात असायचा. यंदा मात्र आवक नसल्याने कापूस खरेदीच्या परंपरागत मजुरांना रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे, तर नोव्हेंबरमध्ये गजबजणाºया या बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.यावर्षी कपाशीची पेरणी तालुक्यात २२ हजार हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील कापसाच्या खासगी बाजारपेठेत नवरात्रच्या मुहूर्तावर कापूस खरेदी मुहूर्त साधणाºया या बाजारपेठेत दसºयापासून कापसाची आवक जोरदार असायची आणि आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खरेदीला सुगीचे दिवस असायचे. दररोज हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी व्हायची. यंदा परतीच्या पावसाने अशी मार दिली की कापासाचे बोंडदेखील नवरात्रोत्सव काळात शेतकºयांच्या घरात आले नाही. त्यामुळे एकाही व्यापाºयाने नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधला साधला नाही. दिवाळीच्या काळात येथील व्यापाºयांनी तुरळक प्रमाणात येणाºया कापसावर खरेदी सुरू केली. कापसाची आवक पाहता व्यापाºयांचा दैनंदिन खर्चही निघत नाही. दिवसभरात संपूर्ण शहरात फक्त २५ ते ३० क्विंटलची आवक आहे, तर तालुक्यात ही आवक १०० ते १५० क्विंटलच्या घरात आहे.एकंदरीतच अवकाळी पावसाने कापसाचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटविल्याने येथील बाजारपेठेच्या इतिहासात प्रथमच इतकी मंदी आहे. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. शेतकरी उत्पादनाअभावी हवालदिल झाले आहे तर कापसाच्या बाजारपेठेतील पूर्ण अर्थ चक्र कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही.दुसरीकडे शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही, यावर्षीची खरेदी १५ नोव्हेंबरनंतरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदाधाग्याच्या लांबीनुसार शासनाने यावर्षी कपाशीची आधारभूत किंमत ठरविली आह. आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रति क्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत.

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर