शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आता चार वाजताच ‘शटर डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २७ जूनपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २७ जूनपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोविडच्या विषाणूंचे प्रकाराने संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सूट देण्यात येत असल्याने निर्बंधांमधे काही प्रमाणात वाढ करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार सर्व दुकाने आता दुपारी चार वाजताच बंद होतील. तसेच सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत मुक्तसंचार करण्यात बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी सायंकाळी हे आदेश पारित केले आहेत. दररोज सायंकाळी ५ वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस ५ पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग तसेच अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग नियमित सुरू असतील. तर अन्य प्रकारचे उद्योग आणि कंपन्या ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.

नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. तसेच या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देण्यात आली आहे.

काय आहेत सुरू

अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने - दररोज दुपारी चारपर्यंत

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने - सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत शनिवार,रविवार बंद

सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, सायकलिंग- सकाळी ५ ते ९ पर्यंत

खासगी कार्यालये -५० टक्के क्षमतेने ४ वाजे पर्यंतच फक्त कार्यालयीन दिवसांसाठीच

शासकीय कार्यलये - ५० टक्के क्षमतेने

क्रीडा प्रकार (आऊट डोअर स्पोर्ट्स) सकाळी ५ ते ९ पर्यंत

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेसह दुपारी चारपर्यंत

लग्न समारंभ दुपारी चार पर्यंतच ५० लोकांच्या उपस्थितीत

अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत

बांधकामे - मजूर राहत असल्यास अशी बांधकामे, चार वाजेनंतर मजुरांना ये-जा करण्यास मनाई राहील.

कृषी संबंधित कामे - दुपारी चारपर्यंतच

ई कॉमर्स - सुरु

जिम, स्पा, सलून - ५० टक्के ग्राहक क्षमतेसह दुपारी चार पर्यंतच

सार्वजनिक प्रवासी वाहतूक - १०० टक्के क्षमतेसह

मालवाहतूक -

आंतर जिल्हा प्रवास

ऑनलाइन शिक्षण

काय आहे बंद

शॉपिंग, मॉल्स थिएटर्स

शाळा महाविद्यालये कोचिंग क्लासेस