शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित शिक्षकाचे तरुणीसोबत ‘शुभमंगल’

By admin | Updated: March 4, 2017 00:49 IST

जळगाव : पहिली बायको व पाच वर्षांचा मुलगा असताना एका शिकवणी चालकाने सोबत असलेल्या तरुणीला पळविले व तिच्याशी लग्न करून प्रमाणपत्रासह ते दोघं शुक्रवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हजर झाले.

जळगाव : पहिली बायको व पाच वर्षांचा मुलगा असताना एका शिकवणी चालकाने सोबत असलेल्या तरुणीला पळविले व तिच्याशी लग्न  करून प्रमाणपत्रासह ते दोघं शुक्रवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हजर झाले. मुलगी पोलीस स्टेशनला आल्याचे कळताच पालकांनी पोलीस स्टेशन गाठले, मात्र मुलीने पालकांना ओळखण्यास नकार देत त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.या घटनेची माहिती अशी की, राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या एका शिकवणी चालकाकडे ही २२ वर्षीय तरुणी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येत होती. या दरम्यान तिचे त्या शिक्षकाशी सूत जुळले. प्रेम अधिकच बहरल्याने दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. शिकवणीला जावून येते असे सांगून गेल्या आठवड्यात ही तरुणी  घरातून गेली, ती शुक्रवारी शिकवणी चालकाशी विवाह करूनच परतली. आळंदी येथे दोघांनी रितसर विवाह केला व त्याचे प्रमाणपत्र घेऊन दोघंही पोलीस स्टेशनला हजर झाले.क्लास चालकाला ५ वर्षाचा मुलगाही तरुणी ज्या शिकवणी चालकासोबत पळून गेली, त्याचे आधी लग्न झालेले असून त्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. या तरुणीसोबत सूत जुळल्याने त्याने पत्नी व मुलाला  माहेरी पाठवून दिले आहे. तू कोण, मी तुला ओळखत नाही... मुलगी हरविल्याची नोंद याच पोलीस स्टेशनला झाली होती. दोघंही पोलीस स्टेशनला आल्यानंतर तपासाधिकारी सुभाष वराडे यांनी दोघांच्या पालकांना फोन करून बोलावून घेतले. तरुणीच्या आई व वडिलांंनी बेटा..घरी चल, म्हणत विनंती केली, तर चुलत भावानेही तिला विनंती केली असता मात्र  ‘ तू कोण, मी तुला ओळखत नाही’ असे म्हणत भावाला ओळखण्यास तिने नकार दिला.  हतबल होऊन तरुणीचे पालक माघारी परतले.