शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

लोंढ्रीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:39 IST

एकवटला गाव : रात्री बारा पर्यंत काम करीत टकेडीवर पाडले चर

पहूर, ता. जामनेर : उजाडलेले रान, कोरडंठाक पडलेली धरणे, ओढे, विहीरी अशा दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी लोंढ्री ता. जामनेर येथील गावकरी पश्रमदानासाठी सरसावले असून रविवारी रात्री बारा पर्यंत काम करुन टेकडीवर चर पादडले आहेत. तसेच जंगलात तब्बल ४५ दिवस गावकरी श्रमदान करणार असून जागोजागी शोषखड्डे केले जाणार आहेत.पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत लोंढ्री गावाचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी गावातील काही युवक व महिलांना पाणी फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.यामुळे काही महिन्यांपासून गावकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून एकजूट करून श्रमदान करीत आहेत. त्यामुळेच दोन जुने आड व एक हात पंप पूर्नजिवीत करून पाण्याच्या जलधारा गावकऱ्यांना पहावयास मिळत आहे.भुमीपुत्र पोलीसअधीक्षकांचा पुढाकारयाकामी लोंढ्रीचे भुमीपूत्र तथा नंदुरबारचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन गावाला एकत्रित करून मला दोन हात व दोन तास द्या अशी हाक दिल्यानंतर लोंढ्रीगाव पाणीदार करण्यासाठी गावकरी श्रमदानाला लागले आहेत. राहून पाटील मार्गदर्शन करीत आहे. कामांचा आढावा नाशिकचे कार्यकारी अभियंता विश्राम पाटील, जैन इरिगेशनचे डॉ. विलास पाटील, बँकेचे व्यवस्थापक निखिल जोशी, पाणी फाऊंडेशनचे तालुका सम्नवयक अश्विन राजपूत, सुनील दुराडे कामांचा आढावा घेत आहेत. तर राजमल भागवत, निंबाजी पाटील, रघुनाथ पाटील, राजाराम चौधरी, भागचंद चव्हाण, राजू जैन काशीनाथ भागवत शत्रघ्न पाटील, डॉ. सुभाष चिकटे, आकाश भागवत, दिलीप पाटील, गोपाल पाटील, बापू चौधरी, शिरीष जैन यांच्यासह गावकरी स्वयंस्फूर्तीने श्रमदानासाठी पुढे आले आहेत.दिंडीने श्रमदानाला प्रारंभगावाजवळील कान्होबा टेकडीजवळील जंगलात रविवारी रात्री श्रमदान करण्याचे नियोजित झाल्याने डॉ. सुभाष चिकटे, गोपाळ पाटील, आकाश भागवत, निखिल जोशी, पाणी फाऊंडेशनचे सुनिल दुराडे व अधिकारी यांनी जागेवर जाऊन मोजमाप केले. संध्याकाळी गावातून टाळ - मृदुंंगाच्या गजरात गावकºयांना श्रमदानासाठी निमंत्रण देत दिंडी थेट कामाच्या ठिकाणी टिक्कम, फावडे व टोपले घेऊन पोहचले. यात महिला अबालवृद्ध, तरुण सहभागी झाले होते.नंदुरबार व जळगाव पोलीस अधीक्षक एक दिवस करणार कामज्यांच्या पुढाकारातून गाव पाणी दार करण्यात येत आहे. ते नंदुरबार चे पोलिस अधीक्षक संजय पाटील व जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे गावाकºयांचा उत्साह वाढविण्यासाठी २३ तारखेनंतर आपल्या परीवारासह लोढ्री येथील गावकºयांसोबत श्रमदान करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्याकडून माहिती गावकºयांकडून मिळाली आहे.साठ हजार लीटर पाणी जमिनीत मुरणारकान्होबा टेकडीवर दोन फुट लांब दोन फुट खोल व पस्तीस मीटर लांब असे अकरा चर गावकºयांच्या श्रमदानातून करण्यात आले आहे. पहिल्या पावसात जवळपास यात साठ हजार लीटर पाणी जमिनीत मुरणार असल्याने भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. दरोरोज शंभर मीटर नियोजित कामाचे स्वरूप असून २६०० घनमीटर प्रर्यंत कामाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. ४५दिवस हे काम चालणार आहे.आर्थिक मदतीसाठी बँकेत खातेया कामासाठी आर्थिक मदत लागणार असल्याने गावातील भुमीपूत्रांना मदतीचे आवाहन करण्यात आले असून यासाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. जवळपास ४०ते ५० हजार मदत जमा झाली आहे. तसेच मदतीचा ओघ सुरु आहे. बाहेरगावी नोकरी निमित्त असलेले लोंढ्रीकर गावासाठी पुढे येत आहेत.