शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वडलीत शिवसेनेच्या पॅनलचा धुव्वा तर वावडद्यात सत्ता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : तालुक्यातील म्हसावद बोरनार गटातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हा धक्का मानला ...

जळगाव : तालुक्यातील म्हसावद बोरनार गटातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. वडली ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पॅनलचा धुराडा उडाला असून सरपंच सचिन पाटील, त्यांची आई विमलबाई हे स्वत: पराभूत झाले असून त्यांच्या पॅनलला फक्त १ जागा मिळाली आहे. प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलने ९ पैकी ८ जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे.

म्हसावद ग्रामपंचायतीच्या १७ जागांमध्ये भूषण चिंचोरे यांच्या नम्रता पॅनलला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. मात्र, सत्ता कोणाची एकाची आलेली नाही. त्याशिवाय येथे अपक्षांनीही बाजी मारली आहे. शिवसेनेचे विजय आमले यांच्या दोन्ही जागा पराभूत झाल्या आहेत. म्हसावदप्रमाणेच बोरनारमध्येही संमिश्र जागा मिळालेल्या आहेत. जवखेडा येथे माजी सरपंच धैर्यसिंग पाटील यांच्या पॅनलच्या ५ जागा विजयी झालेल्या असून एक जागा ईश्वर चिठ्ठीने विजयी झालेली आहे. धैर्यसिंग हे देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मानले जातात. या गटात शिवसेनेचा धुराडा उडालेला आहे.

वावडदा येथे रवी कापडणे यांनी सलग चौथ्यांथा सत्ता मिळवली आहे. ९ पैकी ६ जागांवर कापडणे यांचे उमेदवार विजयी झाले असून प्रतिस्पर्धी राजेश वाढेकर, रवींद्र चव्हाण यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. वडली येथे रामचंद्र पाटील, संभाजी पाटील, धनराज पाटील व अरुण पाटील यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. ९ पैकी ८ उमेदवार त्यांचे विजयी झालेले आहेत.