शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळला तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: December 31, 2015 01:06 IST

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे.

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. गेल्या सहा दिवसांपासून गावात पाणी नसल्याने, शासनाने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी सरपंच अनिल अंबर पाटील यांनी केली आहे.

मंगरूळ गावाला बोरी काठावरील हिंगोणे व कोळपिंप्री येथील विहिरीवरून 10 ते 11 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने, बोरी नदीला पाणीच आले नाही.

त्यामुळे विहिरीचे पुनर्भरण झाले नाही. विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने, गेल्या सहा दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

गाव विहिरीत टाकायलाही पाणी नाही. तामसवाडी धरणातही मृत साठाच शिल्लक असल्याने, यंदा आवर्तन सुटणेही अशक्य आहे. मंगरूळ हे गाव अवर्षणप्रवण भागात येत असल्याने, विहिरींना पाणी नाही. त्यामुळे विहीर अधिग्रहण करूनही उपयोग नाही.

कोळपिंप्री येथील विहिरींमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने, मंगरूळ, शिरूड या दोन्ही गावांना अडचण निर्माण झालेली आहे. मंगरूळ ग्रामपंचायतीने टंचाईसंदर्भात आढावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठवला आहे.

या गावाची लोकसंख्या सुमारे 10 हजार असल्याने, तेथे टॅँकरने पाणीपुरवठा करणेही शक्य नाही. आतापासूनच येथे भीषण पाणीटंचाई भासू लागली असून, आगामी सहा महिन्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिरूडची लोकसंख्या साडेचार हजार असून, पाणीपुरवठय़ासाठी दुसरी योजना नाही.

इंदासे धरणाचा पर्याय

अमळनेर तालुक्याच्या सीमेवर, पारोळा तालुक्यात इंदासे धरण शिरूडपासून पाच तर मंगरूळपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पाईपलाईन टाकून या दोन्ही गावांची समस्या सुटू शकते.

गेल्यावर्षी याच धरणावरून अमळनेर तालुक्याला टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे शासनाने तात्पुरती पाईपलाईन टाकून इंदासे धरणावरून दोन्ही गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)