शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल, कासोदा उपबाजार समितीला ‘सील’

By admin | Updated: March 4, 2017 00:27 IST

जळगाव पीपल्स बँकेची कारवाई : २ कोटी रुपयांची थकबाकी

एरंडोल : जवळपास २ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी जळगाव पीपल्स को-आॅप. बँकेने गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील उपबाजार समितीला सील लावण्याची कारवाई केली. दरम्यान या समितीचा फ्यूज काढून विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला आहे. तसेच समितीच्या आवारातील ओला मका, हरभरा व ज्वारी इ.माल उचलून नेण्यासाठी व्यापाºयांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रमाणेच कासोदा उपबाजार समितीतही कारवाई करण्यात आली.धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत एरंडोल येथे उपबाजार समिती कार्यरत असून जवळपास १० वर्षांपूर्वी टी.एम.सी. योजनेंतर्गत जळगाव पीपल्स बँकेकडून सुमारे ४ कोटी रु. कर्ज घेण्यात आले. त्यापैकी काही रकमेची परतफेड करण्यात आली. तथापि २ कोटी कर्ज थकीत आहे.  बँकेने कर्ज वसुलीसाठी वेळोवेळी तगादा लावला. पण धरणगाव बाजार समितीने उर्वरित कर्जाची परतफेड केली नाही.परिणामी बँकेने सेक्युरिटीटायझेशन अ‍ॅक्टप्रमाणे बाजार समितीची मालमत्ता जप्त करण्याची व एरंडोल उपबाजार समितीला सील लावण्याची कारवाई केली. या उपबाजार समितीच्या कार्यालयाला सील लावण्यात आले व नोटीस लावण्यात आली. याशिवाय प्रवेशद्वाराच्या मुख्य गेटलाही नोटीस लावण्यात आली आहे. ‘ही मालमत्ता दी जळगाव पीपल्स को-आॅप. बँक लि. जळगाव यांचे ताब्यात आहे’ असा फलक गेटवर लावला आहे.एरंडोल उपबाजार समितीची सुमारे १० एकर जागा असून पैकी ५ एकरात बांधकाम करण्यात आले आहे. थकीत कर्ज भरण्यासाठी बाजार समितीने उर्वरित ५ एकर जागा विक्रीसाठी निविदा काढल्या; परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे जागा विकणे शक्य झाले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज थकीत राहिले. दरम्यानच्या काळात शासनाने खासगी बाजार समित्यांना परवानगी दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून येणाºया बाजार फीचे उत्पन्न कमी झाले, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या एरंडोल उपबाजारात ओला मका अदमासे २ ते ३ हजार पोते, हरभरा ६० पोते, ज्वारी १५० पोते याप्रमाणे शेतमाल आहे. शांताराम जगन्नाथ पाटील (एरंडोल), चुडामण दगडू पाटील (धारागीर) या शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला गहू मार्केट बंद असल्यामुळे घरी परत न्यावा लागला. या दोघा शेतकºयांनी संतापजनक  प्रतिक्रिया व्यक्त करून ‘आम्हाला कोणी वाली उरला नाही, म्हणूनच शेतकºयांना बीबीसीत खरेदीपासून ते माल विक्री करेपर्यंत संकटांना सामोरे जावे लागते’ अशी खंत व्यक्त केली.        (वार्ताहर)उपबाजार बंद राहिल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. ऐन रब्बीचा शेतमाल बाजार समितीत आणण्याची सुरुवात झाली तोच बाजार समिती बंद झाली.                                 सचिन जाखेटे (व्यापारी)    व्यापाºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सर्वात जास्त फटका शेतीमालाला बसणार आहे.                                                     मनोज तोतले (व्यापारी)पीपल्स बँकेच्या थकीत कर्जापोटी शुक्रवारी दुपारी ४ लाखांचा धनादेश देण्यात आला असून सायंकाळी एरंडोल येथील व्यापाºयांची बैठक घेऊन त्यांचेकडून अनामत घेऊन रक्कम बँकेला देणार, तसेच कासोदा येथे शनिवारी बैठक घेऊन अनामत जमा करण्यात येतील व जास्तीत जास्त रक्कम कर्जापोटी जमा करण्यात येईल.                                   -भीमराव बाबूराव पाटील, सभापती धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती