शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी भुसावळच्या वृक्षप्रेमींचे पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: July 5, 2017 12:36 IST

चौपदरीकरण करणा:या कंपनीने वृक्षारोपण व संवर्धन करण्याची केली पत्राद्वारे मागणी

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.5 - जिल्ह्यातील आशिया महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त अजूनही सापडला नाही. गेल्या पाच वर्षापासून केवळ भूसंपादन व निविदांच्या तांत्रिक प्रक्रियेत महामार्गाला लागून असलेली लाखो झाडे सूचना नसताना सुद्धा कापली गेली. चौपदरीकरण करणा:या कंपनीनेच वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी करणारे पत्र वृक्षप्रेमींसह प्रा.धीरज पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
 चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहण होण्यापूर्वीच वरणगावपासून भुसावळ व जळगाव रस्त्याला लागून असंख्य वृक्ष तोडण्यात आले. यामुळेच  परिसरातील पर्यावरण बिघडले  आहे. मार्च-एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचले आहे. चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात वृक्षतोडीपासून करणेच मुळात चुकीचे होते. यामुळे  तापमानवाढीत यंदा भर पडली आहे.
महामार्गावरील वृक्षतोड जिल्ह्यात आतार्पयतची सर्वात मोठी  आहे. तीन वर्षात हा महामार्ग तयार होणे अपेक्षित होते. नियमानुसार जेवढी झाडे कापली तेवढी लावण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची होती. केवळ झाड लावणे नव्हे तर त्याला जगविणेदेखील त्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे झाड जगेर्पयत त्याचे संवर्धन करणे हे बंधनकारक आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची कत्तल झाल्यामुळे पर्यावरणात गंभीर बदल झाले आहे असे मत परिसरातील पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे वृक्ष पुनर्लागवड करण्याचे कामदेखील लवकर करण्यात यावे, अशी मागणी  आहे.
जपान सरकारच्या सहकार्याने भुसावळ ते अजिंठा जामनेर मार्गे रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यात ही मोठी वृक्षतोड होणार असल्याने वृक्ष लागवड, संवर्धनाची अट घालण्यात आली होती पण त्या रस्त्यावर बोटावर मोजण्याइतकी झाडे लावून त्यातील किती मोठी झाली याविषयी पर्यावरणप्रेमींना शंका आहे. म्हणजेच मागचा अनुभव फार वाईट आहे. त्याच अनुभवातून आपण आता शिकले पाहिजे.
रखडलेल्या  कामाला गती देण्याआधी या पावसाळ्यात महामार्गाच्या आजूबाजूस असलेल्या भागात वृक्ष तोड करणा:या कंपनीने 24 तास ऑक्सिजन देणारे देशी बहुवार्षिक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी व कंपनीच्या विरोधात तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाहतूक व दळणवळण विभागाचे सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे.चौपदरीकरणाच्या नादात पाच वर्षे वाया गेली, पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. यासंबंधी लवकर कारवाई करावी अन्यथा भुसावळ परिसरातील सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी या विषयासंबंधी जनहित याचिका दाखल करणार आहे.