शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘सर्वोदय’च्या निवडणूक प्रचार तोफा शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 14:46 IST

उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहेत.

ठळक मुद्देरविवारी मतदानकोरोनाची खबरदारी म्हणून सुरक्षित अंतर पाळून मतदान३ रोजी उंबरखेडे येथेच मतमोजणी

चाळीसगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणा-या उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहेत. जाहीर प्रचाराचा वणवा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शांत झाला आहे. रविवार, दि. २  मे रोजी मतदान होत असून, सोमवारी निकालाचे फटाके फुटणार आहे. कोरोनाची खबरदारी घेऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून तयारी पूर्ण झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोदयचा धुराळा चर्चेत आहे. मार्चमध्ये उमेदवाराचे कोरोनाने निधन झाल्यानंतर ही निवडणूक महिनाभर लांबली. न्यायालयाच्या आदेशान्वये ही रणधुमाळी होत असल्याने सर्वांचे यालढाई लक्ष एकवटले आहे. १९ जागांसाठी ४५ उमेदवार नशिब आजमवित आहे. दोन पॕनलमध्ये समोरासमोर लढत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. कोरोनाची खबरदारी घेऊनच मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. १० मतदान केंद्रांवर सुरक्षित अंतर पाळून सभासदांना मतदान करता येणार आहे. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दावरच मतदारांचे निर्जंतुकीरण करून तापमानही मोजले जाईल. त्रास असणा-यांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे. एकूण १० मतदान केंद्रांवर पन्नासहून अधिक कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. ४६७० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

उमदवारांसमोर मतदानाचे आवाहनकोरोना महामारीतच इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. मतदान मागितले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे मोठे आवाहन असणार आहे. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी दोन्ही पॕनलमधील उमेदवार प्रयत्नशील आहे.मातब्बर रिंगणातजि.प.चे माजी सदस्य व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विकास पंडित पाटील,  पं.स.चे माजी सभापती रवींद्र चुडामण पाटील, पं.स.चे माजी सदस्य व उंबरखेडचे लोकनियुक्त सरपंच केदारसिंग पाटील, विद्यमान सचीव उदेसिंग पाटील, चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील, डॉ. उत्तमराव महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही अपक्षही नशिब आजमवित आहे. सर्वसाधारण गटात सर्वाधिक चुरस आहे. महिला, भटक्या - विमुक्त जमाती, अनुसूचित जाती - जमाती, इतर मागास प्रर्वग गटात मात्र समोरासमोर सरळ लढत होत आहे. सोमवारी उंबरखेडे येथेच मतमोजणी, १० टेबलमतमोजणी सोमवारीच उंबरखेडे येथील संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात होणार असून, यासाठी १० टेबल लावण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गर्दी टाळून मतमोजणीची प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २५ कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव