शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांकडून प्रांत, तलाठी यांना दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

भुसावळ : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्याची सूचना करूनही त्याची अंमलबजावणी ...

भुसावळ : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्याची सूचना करूनही त्याची अंमलबजावणी न करता, उलट प्रांत व तलाठ्याच्या अंगावर धावून दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तलाठी विनोद बारी यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला.

प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तलाठी विनोद बारी तसेच दीपक कापसे, चालक ताराचंद बाविस्कर, तहसीलदार यांच्या वाहनावरील चालक विलास नारखेडे हे १७ जुलैला रात्री ८ वाजता सरकारी वाहनाने साकेगाव शिवारात गस्त करत होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास भुसावळ ते जळगाव महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाच्या अलीकडे जळगावकडून येणाऱ्या डम्परला त्यांनी थांबवले. त्यात अवैध गौण खनिज असूनही चालकाकडे परवाना नव्हता. त्यामुळे पथकाने चालक दिगंबर कोळी (रा. साकेगाव) याला ट्रक तहसील कार्यालयात उभा करण्यास सांगितले. तरीही त्याने डम्पर थेट साकेगावमध्ये नेला. प्रांत आणि पथकाने त्याचा पाठलाग करून साकेगाव गाठले. तेथे आलेले डम्परमालक अविनाश चुडामण सोनवणे याने डम्पर माझे आहे. तुमच्याकडून जे होईल ते करा, अशी धमकी देत अंगावर धावून गेला व दमदाटी केली. याप्रकरणी दिगंबर कोळी, अविनाश सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.