शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पैशाचा तगादा अन‌् बेरोजगारीमुळे सलुन व्यवसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन लागले व त्यात हाताचे काम बंद पडल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे संकट ठाकले, त्यातच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन लागले व त्यात हाताचे काम बंद पडल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे संकट ठाकले, त्यातच या काळात ज्यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले, त्यांचा तगादा सुरू झाला. आधीच हाताला काम नाही. त्यात संकटावर संकटे येत असल्याने गजानन कडू वाघ (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, जळगाव मूळ रा. माळपिंप्री, ता. जामनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन वाघ हा तरुण पत्नी सरला, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) यांच्यासह लक्ष्मीनगरात भाड्याचे घर घेऊन वास्तव्याला होता. सलून दुकानावर कारागीर म्हणून तो कामाला होता. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशातही लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली. त्यामुळे त्यांनी हातउसनवारी करून घरखर्च भागवण्यास सुरुवात केली. अनलॉक झाल्यांनतरही निर्बंधामुळे पुरेसे काम मिळत नव्हते. तर दुसरीकडे डोक्यावरील कर्ज वाढत राहिले. त्यातच पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाला होता. याच विवंचनेत असलेला गजानन वाघ काही दिवसांपासून अधिकच तणावात होता. शनिवारी रात्री कुटुंबासोबत जेवण करून सर्व जण झोपले. सकाळी ८.३० वाजता पत्नी सरला झोपेतून उठल्या असता पतीने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी किंचाळी मारली. शेजारील नागरिकांच्या मदतीने लहान भाऊ ईश्वर यांनी गजानन याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी माळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील सोनार तपास करीत आहेत.