शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

`शिवशाही`मधून पहाटे पाच वाजता संत मुक्ताई पालखी पंढरपूरला रवाना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत यंदा पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळा होणार असून, राज्यातील मानाच्या दहा पालख्यानांच पंढरपुरात ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत यंदा पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळा होणार असून, राज्यातील मानाच्या दहा पालख्यानांच पंढरपुरात महामंडळाच्या बसने आणण्याची राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार या दहा पालख्यांमध्ये मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचा समावेश आहे. ही पालखी १९ जुलै रोजी पहाटे पाच वाजता मुक्ताईनगर येथून शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना होणार आहे. पालखी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतर्फे रात्री उशिरापर्यंत विविध रंगबेरंगी आकर्षक फुलांनी सजविण्याचे काम सुरू होते.

जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पालखी सोहळ्यासाठी जळगाव आगारातून दोन शिवशाही बसेस या, मुक्ताईनगर आगाराला देण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर आगारात या बसेस स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. त्यानंतर या बसेस आकर्षक फुलांनी सजविण्यासाठी संत मुक्ताई संस्थांनतर्फे रविवारी दुपारी सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर बसवर नियुक्त केेलेल्या चालक-वाहकांकडून पालखी घेऊन जाणाऱ्या बसेस रात्री उशिरापर्यंत विविध प्रकारच्या फुलांच्या माळांनी सजविण्याचे काम सुरू असल्याचे मुक्ताईनगर येथील सहायक वाहतूक अधीक्षक अमोल बावस्कर यांनी सांगितले.

इन्फो :

आषाढी वारीसाठी यंदा प्रथमच मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना होणार आहे. महामंडळातर्फे या पालखी सोहळ्यासाठी दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिल्या असून, यावर चालक म्हणून एस. आर. नागरूण व डी. एस. पालवे यांचा समावेश आहे. तर वाहक म्हणून कैलास वंजारी व आर. एम. ठाकूर यांचा समावेश आहे. संत मुक्ताई मंदिर प्रशासनातर्फे पहाटे पाच वाजता मुक्ताईनगर येथून बसेस काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या बसेस पंढरपूरच्या दि‌शेने निघणार असल्याचे अमोल बावस्कर यांनी सांगितले. तर आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी या बसेस संत मुक्ताई पालखी घेऊन, पंढरपूरहून परतणार आहे.