शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साईडपटय़ांची दुरुस्ती ‘बोलाचा भात अन् बोलाची कढी’

By admin | Updated: February 14, 2017 23:52 IST

अनास्था : आठवडा उलटूनही आश्वासनाची पूर्तता नाही; दुरुस्तीला प्रारंभ कधी होणार?

जळगाव : सर्वसामान्य नागरिकांसाठी जिवघेणा ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या साईडपट्टी दुरुस्तीचे काम आठवडाभरात सुरु करण्याचे आश्वासन ‘बोलाचा भात अन् बोलाची कढी’ ठरली आहे. आठवडा उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी केराची टोपली दाखविली असल्याचा सुर शहरात उमटत आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नांसंदर्भात रविवार 5 फेब्रुवारी रोजी जळगावचे आमदार सुरेश भोळे  व आमदार चंदूभाई पटेल यांनी नागपूर येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. महामार्गाच्या साईड पट्टयांची मोठी दुरवस्था झाली असून महामार्गावर गेल्या 45 दिवसात 11 जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती आमदार भोळे यांनी गडकरी यांना दिली.  नितीन गडकरी यांनी दोन्ही आमदारांची भावना समजून घेत आठवडाभरात महामार्गाच्या साईडपट्टीचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.त्यांच्या भेटीला 9 दिवसांचा कालावधी उलटला तरी साईडपट्टी दुरुस्तीच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांकडून सुरुवात करण्यात आलेली नाही. साईडपट्टी दुरुस्तीसाठी महामार्ग विभागाचे अधिकारी आणखी बळी जाण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.