शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ ‘रोहन’ला पोहे विक्रेत्या महिलेकडून आईचा ममता

By admin | Updated: May 14, 2017 16:24 IST

‘माय मरो पण मावशी जगो’ अशी अहिराणी भाषेतील म्हण आहे

महेंद्र रामोशे / ऑनलाइन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 14 -  ‘माय मरो पण मावशी जगो’ अशी अहिराणी भाषेतील म्हण आहे. मात्र आईचे निधन झाल्यानंतर जर मावशीही नसेल तर जन्मलेल्या बाळाचे संगोपन कोण करेल, नातेवाईक!  आणि नातेवाईकांनी ही जर पाठ फिरवली तर अशा दुर्देवी बाळाची रवानगी अनाथ आश्रममध्ये केली जाते. मात्र अशाच रोहन पाटील या दुर्दैवी बाळाचे संगोपन येथील साई पोहा विक्री करणा:या सुनंदा गोपाळ झारे या गेल्या नऊ वषार्ंपासून करीत आहेत. रोहनला आईची ममता देऊन त्याचे चांगल्या पद्धतीने संगोपन त्या करीत आहेत, स्वत:ला चार मुलं असूनही रोहनच्या संगोपनात तसुभरही कमी न करणा:या या आईचा रोहनलादेखील तेवढाच लळा लागला आहे.येथील बसस्थानक परिसरात साई  पोहे नावाने पोहे विकणा:या सुनंदा गोपाळ झारे यांचा संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह या  व्यवसायावर अवलंबून आहे. सुनंदा झारे आणि गोपाळ झारे यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. दुकानावर काम करणा:या कारागिराच्या बहिणीचा म्हणजेच शीतलचा रोहन पाटील हा मुलगा. रोहनच्या आईचे अल्पवयात लग्न झाल्यामुळे ‘प्री मॅच्युर्ड’ अवस्थेत रोहनचा जन्म झाला. शीतलवर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र रोहनच्या जन्मानंतर दोन दिवसांनी शीतलचा मृत्यू झाला. त्यानंतर रोहनला ना त्याच्या वडिलांनी नेले ना नातेवाईकांनी. शेवटी सुनंदा झारे यांनी या तीन दिवसांच्या मुलाला आपल्या घरी नेले.   जैन डॉक्टराकडून त्याच्यावर उपचार केल. जन्म झाल्यानंतर न पुसता  कपडय़ात गुंडाळून ठेवण्यात आल्याने रोहनची त्वचा खराब झाली होती.रोहनने जन्म देणा:या आईला पाहिलेले नाही. त्यामुळे सुंदना झारेच आपल्या ख:या आई आहेत, असं त्याला आजही वाटतं. कारण झारे यांनी देखील रोहनच स्वत:च्या मुलासारखे संगोपन केलं आहे आणि करीत आहेत,  रोहनचा जन्म 2008 या वर्षी झाला. आज तो नऊ वर्षाचा आहे. रोहनच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याने त्याला सुदृढ मुलांसारखे चालता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर चांगल्या डॉक्टराकडून उपचार सुरु आहेत. रोहनला शहरातील नामांकित शाळेत दाखल करून शिक्षण दिले जात आहे.सध्या तो इयत्ता तिसरीत असून चागंले गुण देखील मिळवत आहे. सुनंदा झारे यांना सचिन नावाचा मुलगा आहे आणि तीन मुली आहेत. त्यानी देखील रोहनला आपला लहान भाऊच मानलं आहे. त्यामुळे रोहनला हाच आपला परिवार आहे असे वाटतं. कालौघात रोहन जसा मोठा होईल तसे त्याला आपल्या जन्माची दूर्देवी कहाणी कळेल तेंव्हा त्याला झारे परिवाराविषयी अधिक आत्मीयता वाटेल आणि पुन्हा एकदा तो सुनंदा झारे यांना मायेची मिठी मारेल पण तोपयर्ंत सुनंदा झारे या आपल्या आईचे कर्तव्य पार पाडत राहतील.