शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाची बॅटरी, टायर चोरल्याने संताप

By admin | Updated: January 8, 2016 12:20 IST

लुका पोलीस स्टेशनला जमा केलेल्या रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी झाल्याने रिक्षाचालक स्वप्नील पांडुरंग कुळकर्णीने संताप व्यक्त केला.

 जळगाव : तालुका पोलीस स्टेशनला जमा केलेल्या रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी झाल्याने रिक्षाचालक स्वप्नील पांडुरंग कुळकर्णी (रा.पाळधी ता.धरणगाव) यांनी संताप व्यक्त केला. रॉकेल अंगावर ओतले, त्याच्याजवळ जमलेल्या नागरिकांनी त्याची समजूत घातली. यानंतर ते शांत झाले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याच्या प्रकरणात स्वप्नीलला मेमो देऊन वाहन पंधरा दिवसासाठी निलंबित केले होते. आरटीओविभागाने ही कारवाईकेली होती. कारवाईनंतर रिक्षा तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली होती. आरटीओच्या मेमोनुसार स्वप्नील याने गुरुवारी न्यायालयात चार हजार व आरटीओ कार्यालयात दोन हजार दोनशे रुपये भरले. रिक्षा ताब्यात घेण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनला गेला असता तेथे रिक्षाचे एक टायर (स्टेपनी) व बॅटरी चोरी झाल्याचे लक्षात आले. आरटीओ कार्यालय गाठलेपोलिसांनी हाकलून लावल्यानंतर स्वप्नीलने पंधरा लीटर रॉकेल घेऊन आरटीओ कार्यालय गाठले. तेथे वाहन निरीक्षक सदाशिव वाघ यांना भेटून टायर व बॅटरीची भरपाई देण्याची मागणी केली. वाघ यांनीही ती जबाबदारी आमची नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे संतापात त्याने रॉकेल अंगावर टाकले. लोकांनी धाव घेत त्याच्याजवळून काडी व रॉकेलची कॅन ताब्यात घेतली. या प्रकारानंतर स्वप्नील यांचे वडील पांडुरंग कुळकर्णी यांना बोलावून घेतले. त्यांनीही पोलीस व आरटीओ विरूद्ध संताप व्यक्त केला. माझा मुलगा जिवानीशी गेला असता तर त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला.

वाहनावर कारवाई केल्यानंतर ते वाहन जप्त करण्यात आले असले तरी त्यातील वस्तुची जबाबदारी कायद्याने वाहन मालक व चालकाची असते. वाहन जप्त करताना तशा सूचनाही दिल्या जातात. तसेच मेमोवर स्पष्ट शब्दात तसा उल्लेखही असतो. रिक्षाचालक वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटला असता तर समस्या दूर झाली असती. -सुभाष वारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पोलिसांनी जबाबदारी नाकारलीपोलीस स्टेशनला रिक्षा लावूनही बॅटरी व टायर चोरी गेलेच कसे, याची भरपाई कोण करणार असा जाब स्वप्नीलने तालुका पोलिसांना विचारला असता त्यांनी जबाबदारी घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तुमच्या आवारातून वस्तू चोरी झाल्याने तुम्हीच भरपाई द्यावी म्हणून चालक अडून बसल्याने पोलिसांनी ही जबाबदारी आरटीओची असल्याचे सांगितले. व्याजाने पैसे काढून मेमोची रक्कम भरली. त्यात रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी गेल्याचे समजले. या वस्तू घ्यायला पैसे नाहीत. आधीच मेमोची रक्कम भरुन हैराण झालो आहे. आत्मदहन करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही, म्हणून मी हे पाऊल उचलले. मला माझ्या वस्तू मिळाव्यात.-स्वप्नील कुळकर्णी, रिक्षा चालक