शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमळनेरात 9 रोजी आढावा बैठक

By admin | Updated: May 31, 2017 12:18 IST

पूर्व तयारी म्हणून अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली.

ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 30 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  9 जून रोजी अमळनेर येथे जिल्हा आढावा बैठक होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली  उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली. तसेच विविध स्थळांची पाहणी करण्यात आली. जलयुक्त शिवाराची सर्वाधिक कामे अमळनेरात झाल्याने मुख्यमंत्री  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत व इतर योजनांचा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी 9 जून  रोजी अमळनेरात येण्याची शक्यता आहे.  या पाश्र्वभूमीवर बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी हजर होते. त्यात जलयुक्तची 100 टक्के कामे पूर्ण करणे, मागेल त्याला शेततळे, कृषी पंपांना वीज जोडणी, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व नागरी योजनेचा आढावा, प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज पुनर्गठनाचा आढावा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेण्यात आला.तसेच मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर उतरविण्यात येणार आहे.   मुख्यमंत्री मारवड येथील माळण नदी, सडावण चाकवे येथील नाला खोलीकरण व नगाव येथील शेततळे आदींची पाहणी करणार असल्याची शक्यता असल्याने, अधिका:यांनी त्याठिकाणी पहाणी केली.  या बैठकीस उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, कार्यकारी अभियंता एस.एन.वाघ, वीज मंडळाचे उपकार्यकारी  अभियंता मनोज पवार, कार्यकारी  अभियंता आर.के.नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय सोनवणे, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, लघुसिंचनचे उपविभागीय अधिकारी एस.एच.पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील, संजय चौधरी, पोलीस निरीक्षक विकास वाघ, व्ही.बी.पाटील उपस्थित होते.