शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांसह आवाजावरही निर्बंध

By admin | Updated: October 28, 2016 00:15 IST

फटाके विक्री व साठवणुकीवर बंधने घातली गेली आहेत. त्याबरोबर फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

अमरावती : फटाके विक्री व साठवणुकीवर बंधने घातली गेली आहेत. त्याबरोबर फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाबाबत दंडक घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा आणि दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत मिळालेल्या अधिकारानुसार केंद्र शासनाने ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) २००० बनविला आहे. ध्वनीप्रदूषण नियम २००० अन्वये नियम ५ मध्ये ध्वनीक्षेपक, राज्य आणि आवाज निर्माण करणारे कोणतेही यंत्र यांचा सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी वापर करण्यास बंधन घातले आहे. तसेच नियम ५ अ अंतर्गत शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक, फटाके, वाद्य इत्यादी वापरण्यास मनाई केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी आदेश काढले आहेत. निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल, व्यापारी क्षेत्रात ६५ डेसिबल व औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल इतकी ध्वनीची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही वाद्य, ध्वनीक्षेपक वाजवण्यास मनाई केली आहे. ध्वनीप्रदूषण नियम व नियंत्रण २००० च्या नियम ५ (३) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृहे, सामूहिक सभागृह, मेजवानी कक्ष यासारख्या बंंद जागेखेरीजइतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत करण्यात येईल. दिवाळीतील लक्ष्मीपुजनाचा दिवस, ख्रिसमस व ३१ डिसेंबर या प्रत्येकी १ दिवस अशा तीन दिवशी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धकाचा वापर अनुज्ञेय राहणार आहे. पाच वर्षे शिक्षाध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये गुन्हा दाखल केल्या जावू शकतो. या गुन्ह्यात ५ वर्षे शिक्षा व १ लाख रुपयांची दंडाची तरतूद आहे. (प्रतिनिधी)