यावेळी जिल्हा परिषद जळगाव जि. प. सेस योजना २०२०, २०२१ अंतर्गत जिल्हा कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या माध्यमातून शेती, तसेच शेतीपूरक व्यवसायात उत्कृष्ट काम केल्याबद्दल लोणपिराचे येथील शेतकरी विजय सुधाकर पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व १० हजार रुपयांचा धनादेश शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक पं. स. सभापती डाॅ. अर्चना विशाल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच माजी जि. प. सदस्य विकास पाटील, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवराज पाटील वडधे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. विशाल पाटील, जि. प. माजी शिक्षण सभापती विकास पाटील, माजी सभापती रामकृष्ण पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान अली सय्यद, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे, पं. स. सदस्य रावण भिल, पं. स. भडगावचे अधीक्षक दिलीप चिंचोरे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भडगाव पंचायत समितीत सत्कार सभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST