शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरड धान्य खरेदी आदेश प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची दखल घेत शासनाकडे पाठपुरावा करून भरड धान्य खरेदी करण्याचे आदेश आणले. त्यात ज्वारी खरेदीचे ...

पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची दखल घेत शासनाकडे पाठपुरावा करून भरड धान्य खरेदी करण्याचे आदेश आणले. त्यात ज्वारी खरेदीचे आदेश मार्केट फेडरेशन यांच्याकडे आलेले आहेत. तरी मक्याचे खरेदी करण्याचे आदेश लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली. म्हणून ‘थाली बजाव’ आंदोलन स्थगित करण्यात आले.

तसेच भरड धान्य खरेदीसोबतच इतर विषयांचेही निवेदन पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जळगाव जिल्हा केळी क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात यावा. त्यासोबत जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी कापूस पीक विमा काढलेला आहे. कापूस या पिकाचे बोंडअळीने ८० टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना बिघ्याला तीन क्विंटल कापूस पिकलेला आहे. ही बाब जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. याकरिता कापूस उत्पादकांना पीकविमाचे संरक्षण कवच म्हणून नुकसानभरपाई मिळावी, अशी चर्चा शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केली. त्यासोबतच कांदा बियाणाच्या उत्पादक कंपन्यांनी कांदा बियाणाच्या किमतीवर निर्बंध आणावा, अशी मागणीही शेतकरी संघटनेने केली आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी, नामदेव महाजन, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, मंगेश राजपूत, नंदलाल पाटील, सय्यद देशमुख, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाकडून भरड धान्य खरेदीमध्ये ज्वारीची खरेदी करण्याचे आदेश आणले आहेत. मात्र मका खरेदी करण्याचे आदेश लवकरच आणू अशी चर्चा झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या घरासमोर खाली बजाव आंदोलन स्थगित करण्यात येत आहे

-संदीप आधार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष,

शेतकरी संघटना, जळगाव