शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला कापूस बियाणांची 502 पाकीट ‘सील’

By admin | Updated: May 13, 2017 17:08 IST

कृषी केंद्रांवरील 502 पाकीट सील करण्यात आले

ऑनलाइन लोकमत

रावेर, जि. जळगाव, दि. 13 - राज्याच्या बियाणे गुणनियंत्रण आयुक्तालय संचालकांच्या आदेशानुसार राशी 659 बीजी- 2 या कापूस बियाणांचे पाकीट तातडीने  सील करून बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश जारी होताच शनिवारी रावेर  शहरासह तालुक्यातील सावदा येथील कृषी केंद्रांवरील 502 पाकीट सील करण्यात आले.  रावेर पं. स.चे कृषी विस्तार अधिकारी एस.एस. काळेल यांनी ही  कारवाई करीत विक्री बंद केली.     दरम्यान, तालुक्यात राशी 659 बीजी 2 या वाणाची मागणी तब्बल आठ ते साडेआठ हजार पाकिटांची असताना केवळ 502 पाकीट  अर्थात 5 ते 6 टक्के बियाणे  सील केल्याने काळ्याबाजारासाठी काही पाणी तर मुरत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.   पं.स. सदस्य दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाघाडी परिसरासह तालुक्यातील काही शेतक:ांनी राशी 659 बीजी - 2 च्या बियाणांची पाकिटे उपलब्ध करून देण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन आज निवासी नायब तहसीलदार सी. एच. पाटील यांना देवून शासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.  रावेर तालुक्यातील खरीप हंगामात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र 14 हजार 900 हेक्टर एवढे आहे. गतवर्षी 15 हजार 671 हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आल्याने यंदा 15 हजार 730 हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली येणे अपेक्षित असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्याकरिता 71 हजार 509 बीजी- 2(बीटी)कापसाची पाकिटे अपेक्षित असून, राशी 659 बीजी - 2बियाण्याची वाढती मागणी होती.         गतवर्षी  तालुक्यातील वाघोड येथे काही  शेतक:यांच्या राशी 659 बीजी-2 या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने राज्याच्या बी-बियाणे गुण नियंत्रण कृषी आयुक्तालय संचालकांनी राशी 659 बीजी- 2 या कापसाच्या वाणाची तातडीने विक्री थांबवून त्या बियाण्यांचा माल स्टॉकसील  करण्याचे आदेश पारीत केले होते. त्या अनुषंगाने रावेर व सावदा शहरातील कृषी खरेदी केंद्रातील सदरील कापसाच्या वाणाचे 502 पाकीटांना स्टॉकसील करून विक्रीबंदची कारवाई रावेर पं स च्या कृषी विस्तार अधिकारी एस एस काळेल यांनी केली. तालुक्यात  या कापसाच्या वाणाचे सुमारे आठ ते साडेआठ हजार पाकिटांची बुकींग झाली असताना  कारवाई  केवळ 502 पाकीट सील करून विक्रीबंदची करण्यात आलेली कारवाई ही खरोखरच कारवाई होती? की कारवाईचा नुसताच कांगावा केला गेला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.         रावेर व सावदा शहरातील विविध कृषी केंद्रांवर राशी 659 बीजी - 2 चे 502 पाकीट सील करून विक्रीबंदची कारवाई करण्यात आली आहे.- एस.एस. काळेल, बी - बियाणे गुण नियंत्रण विस्तार अधिकारी,  पं स, रावेर.