शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

संत मुक्ताई संस्थानने पाठविली संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ व सोपानदेवांना राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:16 IST

यंदापासून उपक्रम : विश्व पट ब्रrादारा.. ताटी उघडा ज्ञानेश्वरा..

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज व सासवडला संत सोपानदेवांनाही शनिवारी टपालातून राखी मुक्ताईकडून ज्ञानोबारायांना राखी अर्पणपरंपरा पुढे

ऑनलाईन लोकमत / विनायक वाडेकर 

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 7 -  : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र  धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांना रविवारी हातोहात राखी पाठविण्यात आली.  आळंदी संस्थानकडूनही या प्रेमाच्या धाग्याचा स्वीकार करीत विश्व पट ब्रrादारा (धागा).. ताटी उघडा ज्ञानेश्वरा .. या ताटीच्या अभंगाची जणू आठवण करून दिली. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज व सासवडला संत सोपानदेवांनाही शनिवारी टपालातून राखी पाठविण्यात आल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. मुक्ताई संस्थानकडून संत भावंडांना राखी पाठविण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. बहीण - भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीच्या धाग्याने आज ही दोन संस्थाने जोडलीच, शिवाय प्रेमाचा ओलावाही निर्माण झाला. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या संकल्पनेनुसार रविवारी संस्थानचे पदाधिकारी आळंदीत पोहचले. तिथे संत मुक्ताईतर्फे संत ज्ञानेश्वर माऊलींना राखी पौणिमेनिमित्त राखी अर्पण करण्यात आली. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानच्या वतीने विश्वस्त अभय टिळक व पदाधिका:यांनी या राखीचा स्वीकार केला. संस्थानच्या वतीने संदीप रवींद्र पाटील, लहूदकर महाराज, सागर महाराज हे राखी घेऊन आळंदीला गेले होते.  आषाढी वारीच्या वेळी पंढरपूर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र येत असतात. त्या वेळी ज्ञानेश्वर महाराज पालखीकडून संत मुक्ताई पालखीला साडी-चोळी अर्पण केली जाते. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ती अजूनही सुरू आहे. आता मुक्ताईकडून ज्ञानोबारायांना राखी अर्पण करून हीच परंपरा पुढे नेली जात आहे. संत मुक्ताईमुळेच  निवृत्तीनाथ, ज्ञानोबा माऊली आणि सोपानदादा हे संतपदार्पयत पोहचले. मुक्ताईमुळेच ताटीचे अभंग बाहेर आले.. या राखीचा आम्ही आनंदात स्वीकार करतो.. हे प्रेम आजच नाही भविष्यातही कायम राहिल.    -अभय टिळक, विश्वस्त, आळंदी संस्थान. यापुढे दरवर्षी मुक्ताई संस्थानकडून तीनही भावंडांना राखी पाठविली जाणार आहे. यावर्षी सुरुवात केली आहे. मुक्ताईनगरमधूनच या राख्या घेण्यात आल्या आहेत. -संदीप पाटील, विश्वस्त, मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर.