शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सन्मानाने जगण्याची उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:46 IST

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची होणारी परवड थांबावी म्हणून महाराष्ट्रात एकमेव नाशिक विभागात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अभिनव ह्यउभारीह्ण संकल्पना अमलात आणली असून त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेत

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची होणारी परवड थांबावी म्हणून महाराष्ट्रात एकमेव नाशिक विभागात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अभिनव ह्यउभारीह्ण संकल्पना अमलात आणली असून त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेतकर्जबाजारी झाल्याने किंवा निसर्गाने तोंड फिरवल्याने मोठा आर्थिक फटका बसला की अनेक शेतकरी आत्महत्या करतात. शासन राजकीय आणि सामाजिक नेते तेवढ्यापुरते सहानुभूती दाखवून मदतीचे आश्वासन देऊन निघून जातात. नंतर मात्र प्रत्यक्ष अर्ज करण्याससुद्धा मदत केली जात नाही एव्हडी हेळसांड त्या कुटुंबाची होते. अगदी शासकीय पातळीवरदेखील तलाठी किंवा इतर अधिकारी साधा वारस लावण्यासाठी मदतीऐवजी फिरवाफिरव करून अनेकदा त्यांची आर्थिक लूट केल्याचेही उघडकीस आले आहे. समाजात या कुटुंबाची पत रहात नाही म्हणून आयुक्त गमे यांनी या पीडितांच्या व्यथा जाणून त्यांच्याबद्दलची सहानुभूती जागृत करून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, स्वावलंबी व्हावे म्हणून उभारी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.उभारी योजनेंतर्गत गमे यांनी महसूल विभागातील पालक अधिकारी नेमले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तेथे पालक अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांचे सर्वेक्षण करायचे त्या त्या कुटुंबाची जबाबदारी पालक अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या पीडित नागरिकांच्या प्रती वर्तणुकीतदेखील आपोआप बदल होऊ लागले आहेत.पालक अधिकाऱ्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला महसूल विभाग, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडवायच्या आहेत त्यांच्या वारसांना कागदोपत्री सर्व मदत व सहकार्य करायचे आहे त्या कुटुंबाना संजय गांधी, इंदिरा गांधी, कुटुंब अर्थसहाय्य, प्राधान्य कुटुंब योजना यात जेथे पात्र ठरतील त्याचा लाभ देणे तसेच बांधावरील वृक्ष लागवड, घरकुल योजना, गोठा शेड, कृषी विभागाच्या फळबाग योजना, बियाणे, अवजार वाटप यात लाभ व रोजगार मिळवून देणे आदी कामे करायची असून विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्या पीडित कुटुंबातील मुलांचे शिक्षण, नोकरी यासाठी मदत मिळवून द्यायची आदी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने पालक अधिकारी कामास लागले आहेत. अमळनेर तालुक्यात ५१ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून एक कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध करून दिला आहे तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील स्थानिक प्रांत व तहसीलदार या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्याचे काम निव्वळ नाशिक विभागात केले जात आहे ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. गमे यांचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे तर भ्रष्टाचाराचा बट्टा लागलेले महसूल कर्मचारी संपूर्ण राज्यात आदर्श ठरतील.आयुक्त गमे यांच्या उभारी संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती वाढली आहे. निराधार कुटुंबाला मदत करून त्यांच्या जीवनाची दिशा बदलल्याचे समाधान देखील मिळत आहे.-मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार,अमळनेर

टॅग्स :GovernmentसरकारAmalnerअमळनेर