शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:42 IST

सर्वांनाच दिलासा : हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले, वाघूर नदीलाही पूर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी सकाळी दमदार पुनर्रागमन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गुरुवारी  सकाळपासून पाऊस सुरू आहे.  बरसणाºया आनंदसरींनी बळीराजासह सर्वच जण सुखावले असून पिकांनाही जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थान परिसरातही जोरदार पाऊस झाला. यामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी, पूर्णा नदीला पूर आला आहे. दुसरीकडे वाघूर नदीलाही पूर आला आहे. जून महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली खरी मात्र मध्यंतरी वारंवार पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची चिंता बळीराजाला लागली. तसे पाहता जून महिन्यात पावसाचा कमीच अंदाज वर्तविला होता. मात्र आता सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाला. 

अल्हाददायक वातावरण घेऊन आली सकाळगेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा होऊन पाऊस येणार असे सर्वांनाच वाटत होते. इतकेच नव्हे तर अनेक वेळा ढगाळ वातावरण होऊन पावसाचा शिडकावही झाला. मात्र दमदार पाऊस न होता वारंवार पावसाने दडी मारली. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होऊन गार वारा सुटला. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला एक-दीड तास मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असताना सकाळी साडे दहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. बहुप्रतीक्षेनंतर तब्बल पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. अल्हाददायक वातावरण घेऊन आलेल्या  बुधवारच्या सकाळने सर्वच जण सुखावले. दुपारी पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरण कायम होते.  

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडलेहतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ३० हजार ५१६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळपासून तीन वेळा धरणाचे दरवाजे टप्प्या-टप्प्याने उघडण्यात आले. यामध्ये सकाळी नऊ वाजता धरणाचे १२ दरवाजे, त्यानंतर सकाळी १० वाजता १४ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. पावसाचा जोर वाढून धरणात पाण्याचाही वेगही वाढू लागल्याने दुपारी एक वाजता धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला आहे. 

जिल्ह्यात ५१ मि.मी. पाऊसजिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ५१ मि.मी. पाऊस झाला असून यामध्ये सर्वाधिक १५.३३ मि.मी. पाऊस यावल तालुक्यात तर त्या खालोखाल चोपडा तालुक्यात १०.८५ मि.मी. पाऊस झाला. जळगाव, भुसावळ, पाचोरा, धरणगाव तालुक्यात मात्र शून्य टक्के पावसाची नोंद झाली. 

वाघूर नदीला पूरजळगाव व जामनेर तालुकावासीयांची तहान भागविण्याºया वाघूर धरणातही पाण्याचा वेग वाढला आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी जवळील डोंगररांगामध्ये जोरदार पाऊस झाल्याने वाघूर नदीला पूर आला आहे.  अजिंठा लेणीमध्ये वाघूर नदीवरील सातकुंड धबधलाही कोसळू लागला आहे.