शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस उडाला आकाशी, ऊन सावलीचा खेळ पिकाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

भडगाव : मागील वर्षाची या तारखेपर्यंत खरीप हंगाम पेरणी व पावसाची स्थिती पाहिल्यास यंदा पावसाचा सरिपाटाचा खेळ ‘कभी ...

भडगाव : मागील वर्षाची या तारखेपर्यंत खरीप हंगाम पेरणी व पावसाची स्थिती पाहिल्यास यंदा पावसाचा सरिपाटाचा खेळ ‘कभी हा, कभी ना’ असा सुरू आहे. परिणामी, मागील वर्षी भडगाव तालुक्यात शंभर टक्के पेरण्या होऊन पाऊसही चांगला होता. यंदा मात्र तालुक्यात फक्त ८७ टक्के पीक पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे पाऊसही उशिरा अन्‌ पीक पेरण्याही उशिरा झाल्या. या सर्व पिकांची तापमानाने लाहीलाही होत आहे. पिके पाण्यासाठी ‘आ’ वासून आहेत. भडगाव तालुक्यात ३०५७५ हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगाम नुकसानाच्या वाटेवर दिसत आहे.

अजून आठवडाभरात पाऊस पडला नाही तर दुबार पीक पेरणी करावी लागते की काय? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेती कामांना वेग अन्‌ पावसाला ब्रेक, अशी स्थिती आहे. सध्या रोज ढगाळ व पावसाचे वातावरण होते. ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे.

भडगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या कपाशी, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांसह एकूण ३० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या करण्यात आल्या. म्हणजे आतापर्यंत तालुक्यात ८७ टक्के पीक पेरण्या झाल्या आहेत; मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यात उर्वरित १३ टक्के खरिपाच्या पेरण्या पिछाडीवर असून, खोळंबल्या आहेत. भडगाव तालुक्यात आतापर्यंत पाऊस एकूण १४० मीमी बरसल्याची प्रशासनाने नोंद केली आहे. मागील वर्षाची स्थिती पाहिल्यास तालुक्यात जून महिन्यात चांगला पाऊस बरसल्याने या तारखेपर्यंत शंभर टक्के पीक पेरण्या होत. मागील वर्षी आतापर्यंतच्या तारखेपर्यंत पाऊसही १७३ मीमी. पडल्याची नोंद आहे. तालुक्यात शेवटचा पाऊस २८ जूनला झाला होता. त्यानंतर ४ रोजी भडगाव तालुक्यात फक्त खेडगाव शिवारात ठराविक ठिकाणीच पाऊस झाला आहे. मृग नक्षत्र ५० टक्के कोरडा गेला. सध्या आश्विन नक्षत्र सुरू आहे; मात्र तेही कोरडेच जात आहे. अजूनही आठवडाभर पाऊस पडला नाही तर खरीप हंगामाचे पूर्णत: नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांवर दुबार पीक पेरण्यांची वेळ येऊ शकते.

यंदाची पीक परिस्थिती (हेक्टर)

कापूस-२४ हजार ८००

बागायत-१६ हजार

जिरायत क्षेत्र ८, ८००

ज्वारी : ७५०

बाजरी-६७५

मका-२४५०

मूग-७५०

उडीद-६७५

सोयाबीन-४७५

भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ३० हजार ५७५ हेक्टरवर पीक पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत पाऊस १४० मी. मी. झाला आहे. पिकांना पावसाची आवश्यकता आहे. आठवडाभरात पाऊस न पडल्यास पिकांच्या नुकसानाची शक्यता आहे. दुबार पेरणीची शक्यताही नाकारता येत नाही.

-बी. बी. गोरडे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव.