शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वेने मे महिन्यात केली ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकवेळा प्रवासी गाड्या सुरू-बंद होत असताना मात्र मालवाहतूक सुरळीत सुरू होती. एप्रिल ते मे दरम्यान २०२१ मध्ये ...

कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकवेळा प्रवासी गाड्या सुरू-बंद होत असताना मात्र मालवाहतूक सुरळीत सुरू होती. एप्रिल ते मे दरम्यान २०२१ मध्ये १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग झाली. जी एप्रिल ते मे २०२० दरम्यान झालेल्या ७.५५ दशलक्ष टन लोडिंगपेक्षा ६६.५ टक्के जास्त आहे.

व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोविड आव्हाने असूनही मध्य रेल्वेने मे २०२१ या महिन्यात मालवाहतूक लोडिंगमध्ये भर पाडली आहे.

मे २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ६.३२ दशलक्ष टन वाहतूक केली जी मे २०२० मधील ४.३३ दशलक्ष टनच्या तुलनेत ४५.९ टक्के जास्त होते.

मे २०२१ मध्ये ३.५७ दशलक्ष टन कोळसा, ०.२१ दशलक्ष टन लोह व स्टील, ०.५८ दशलक्ष टन सिमेंट, ०.८६ दशलक्ष टन कंटेनर आणि १.१० दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे.

एप्रिल ते मे २०२१ या काळात मध्य रेल्वेने १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी २०२० मधील याच कालावधीतील ७.५५ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांनी जास्त आहे.

मध्य रेल्वेतील १२.५७ दशलक्ष टन मालवाहतुकीत मुंबई विभाग २.८३ दशलक्ष टन, भुसावळ विभाग ०.९५ दशलक्ष टन, नागपूर विभाग ७.३० दशलक्ष टन, पुणे विभाग ०.२९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग १.२० दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.

रेल्वेतील मालवाहतूक अतिशय आकर्षक करण्यासाठी रेल्वेमध्ये अनेक सूट /सवलतीही दिल्या जात आहेत. वेगवान मालवाहतुकीसाठी केलेल्या सुधारणेमुळे सर्व भागधारकांच्या पैशांची बचत होते. वर्षभरात मालवाहतुकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.