शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 14:48 IST

भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर शुकशुकाटफलाटांवर सुमारे तिनशेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेतेखाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोनाची प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.भुसावळ विभागात भुसावळ रेल्वेस्थानकावर दररोज १८० पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा करतात. स्थानकावरील फलाटांवर सुमारे तिनशेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे पाय मेहनत करून कुटुंबियांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा याकरिता दोन पैसे मिळावे या हेतूने डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे मात्र गेल्या २३ मार्चपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी करण्यात आले असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.रेल्वे स्थानकावर फूड प्लाझा, सेल किचन, फळांचे स्टॉल, खेळणीचे स्टॉल, तीन वॉटर वेंडिंग मशिन याद्वारे तिनशेपेक्षा जास्त मजूर चहा, वडापाव, स्नॅक्स, कोल्ड्रिंक विकून आपला उदरनिर्वाह भागवत होते.रेल्वेस्थानकाबाहेरील व्यावसायिकांनी वरही उपासमारीची वेळस्थानकावरील जी स्थिती हातमजुरांची आहे ती स्थिती रेल्वेस्थानकाच्या बाहेरील असलेले छोटे-मोठे उद्योगधंदे चहा, फराळाचे दुकाने बंद पडल्यामुळे रेल्वेच्या आवारातसुद्धा असलेले दुकान बंद असल्याने सुमारे आठशेपेक्षा जास्त विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.रेल्वेच्या प्रवाशांचे ओझे वाहून नेणारे कुलीसुद्धा रेल्वे बंद असल्यामुळे अडचणीत आले आहेत. रेल्वे अवलंबून असणारे हमाल, आॅटो चालक, चहापान हमालांची स्थावर मालमत्ता नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व तळागाळातील जीवन जगत होते. उदरनिर्वाह कसा चालवावा याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे यांना चांगलाच फटका बसलाय. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिवार्हाची व्यवस्था करावी. विशेषत: ज्या मक्तेदारांकडे मजूरवर्ग कामावर होते त्यांनी तरी निदान या परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिक सहकार्यातूून जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.लॉकडाऊन नंतर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आतापासूनच नियोजन हवेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत पहिले लॉकडाऊन व १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविले. परिस्थिती आटोक्यात असली तर दुसरे लावून जर तीन महिन्यानंतर उघडलेस तर रेल्वे स्थानकावर येणाºया प्रत्येक प्रवाशांची आरोग्य तपासणी वावी व प्रवास सुरक्षित व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले तर येणारा काळामध्ये कोरोनाचा धोका टळू शकतो मात्र यासाठी चोख नियोजन हवे आहे नाहीतर ‘प्यास लगी तब खोदा कुवा’ असे व्हायला नको यावर गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.लॉकडाऊन झाल्यापासून रेल्वेस्थानकावरील हातावर पोट भरणारे वेंडर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वेला सेवा बजावणाºया वेंडर्सकडे लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे कुली बांधवांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली निदान तेवढे तरी मदत करावी, उभ्या आयुष्यापासून रेल्वेसाठी सेवा बजावत आहेत.-कय्युम खाटीक, सचिव, रेल्वे वेंडर्स असोसिएशन, भुसावळ