शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जून अखेर भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्प सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार सचिन देव जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प ...

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार

सचिन देव

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. या वर्षी जूनअखेर हा प्रकल्प सुरू होणार असून, या

प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती आयआरटीसीचे सहायक महाव्यवस्थापक आनंद झा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. भुसा‌वळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात असून, हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटरमध्ये या प्रकल्पाचे काम असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किमतीला विक्री करण्यात येणार आहे. यामुळे स्टेशनवरील इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.

इन्फो :

महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प

भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात येणारा ‘रेल नीर’चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे प्रकल्प सुरू असून, लवकरच भुसावळ येथेही सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पात मनुष्यबळाच्या भरतीसाठी आयआरसीटीसीतर्फे लवकरच नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून, योग्य अर्हता प्राप्त असलेल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत : १०० ते १२५ जागांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रवाशांना मिळणार स्वस्त व शुद्ध पाणी

सुमारे आठ कोटी रुपये खर्चून उभ्या राहणाऱ्या भुसावळातील ‘रेल नीर’ प्रकल्पामध्ये प्रवाशांना अवघ्या १५ रुपयात स्वस्त व शुद्ध पाण्याची बॉटल मिळणार आहे. या नीर प्रकल्पात विविध प्रकारच्या १२ टप्प्यात जल शुद्धीकरणाची प्रक्रिया होणार असून, यामध्ये तुरटी प्रक्रिया, क्लोरिनायझेशन, कार्बन फिल्टर, त्यानंतर १० मायक्रॉन ते ०. ५ मायक्रॉन पर्यंतच्या फिल्टर प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होणार आहे. एस.एन. फुड्स या कंपनीला हे काम सोपविण्यात आले असल्याचे आयआरटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आयआरसीटीसीतर्फे भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पात २४ तासात ७२ हजार पाण्याच्या बॉटल तयार होणार असून, या प्रकल्पात कामासाठी स्थानिक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहोत.

- आनंद झा, सहायक महाव्यवस्थापक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, दिल्ली.