शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गं. स. विद्यालय ग्रीन स्कूलसोबतच झाले डिजिटल, पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

दरम्यान, पुढच्या पिढीला आदर्श अशी शाळा येत्या काळात उभी करा. त्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून मोठी मदत करेन, असे ...

दरम्यान, पुढच्या पिढीला आदर्श अशी शाळा येत्या काळात उभी करा. त्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून मोठी मदत करेन, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटक म्हणून दिले. त्यांनी शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे व मुख्याध्यापक दिगंबर महाले यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले.

यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, संस्थेचे संचालक प्रदीप अग्रवाल, संदेश गुजराथी, हरी भिका वाणी, अध्यक्ष अनिल कदम, उपाध्यक्ष कमल कोचर व माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, अभिजीत भांडारकर, निलेश भांडारकर, प्रभाकर कोठावदे , प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश शिरोडे, अनिल वैद्य, द्रौ. रा. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जे. के. सोनवणे,उपमुख्याध्यापक ए. एस. करस्कार, पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते.

आमदार पाटील यांनी ध्वजारोहण करून शाळेचा लोगो असलेला संदेशात्मक कंदील फुग्यांच्या सहाय्याने आकाशात उंच सोडला. आमदारांनी सपत्नीक भूमातेचे पूजन केले. सर्व प्रमुख अतिथींसह उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. यावेळी ग्रीन स्कूलची संकल्पना असलेला केकही कापण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापक पी. एल. मेखा, आर. सी. मोराणकर, एस. एम. बडगुजर, सी. झेड. पाटकरी, एन. एम. पाटील, एस. डी. पाटील व एन. आर. वानखेडे यांचा समावेश होता.

मुख्याध्यापक महाले यांनी ग्रीन स्कूलची, डिजिटलायझेशन व पेपरलेस स्कूलची संकल्पना विशद केली. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी, निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमात शालेय शिक्षक व शिक्षिका यांचा ग्रीन स्कूलला पूरक पेहराव लक्षवेधी ठरला. सूत्रसंचालन शिक्षक अमित पाटील यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक ए. एस. करस्कार यांनी मानले.

210721\21jal_6_21072021_12.jpg

गं. स. विद्यालय ग्रीन स्कूल सोबतच झाली डिजिटल, पेपरलेस