शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

प्रा. डॉ. नितीनचंद्र पाटील यांना पीएच.डी. प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:16 IST

क्रोमोटो ग्राफीज स्टडीज् ऑफ मेडीकल प्लांट एक्सट्रॅक्ट ॲण्ड इटस् बायोकेमिकल ॲक्टिव्हिटीज या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. प्रा. ...

क्रोमोटो ग्राफीज स्टडीज् ऑफ मेडीकल प्लांट एक्सट्रॅक्ट ॲण्ड इटस् बायोकेमिकल ॲक्टिव्हिटीज या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. प्रा. डॉ. नितीनचंद्र हे गेल्या वीस वर्षांपासून गुलाबराव देवकर इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य पदावर आहे. शोधप्रबंधासाठी त्यांना प्रा. डॉ. मिलिंद उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी. मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्‍यक्ष गुलाबराव देवकर, भास्कर पाटील, विजय काळे, अनिल पाटील, अजय पाटील, मंगेश पाटील, डॉ. सुनील कोतवाल, बापू पाटील, आदींनी अभिनंदन केले आहे.

====================================

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्यावतीने बुधवारी साजरी करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा व ग्रामीण तालुका व महानगरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी राहून महाराजांना अभिवादन केले.

=====================================

नेहा मोता हिला दहा लाखांची शिष्यवृत्ती

फोटो : ५.५० वाजेचा मेल आहे. सागर दुबे नावाने

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारत सरकारच्या केंद्रीय विभागातील अल्पसंख्‍याक कार्य मंत्रालयाच्यावतीने मेरीट कम मिन्स अंतर्गत जळगावच्या नेहा महेश मोता हिला १०.६० लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्‍यात आली आहे.

कच्छी दशा-विशा ओसवाल जैन समाजाचे सदस्य महेश कांतीलाल मोता यांची ती कन्या आहे. नेहा ही आय.आय.एम. बेंगलूरू येथे एमबीएच्या द्वितीय वर्षाला आहे. तिने शालेय जीवनात अनेक शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत. प्रामुख्याने इयत्ता सातवीत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती, दिल्लीमधील नॅशनल टॅलेंट स्काॅलरशिप, इन्स्पायर्ड अवाॅर्ड, धिरूभाई अंबानी रिलायन्स फाऊंडेशनची स्काॅलरशिप, आदी शिष्यवृत्त्या मिळालेल्या आहेत. दहावीत शाळेत प्रथम, तर बारावीत शहरातून प्रथम क्रमांक तिने पटकाविला होता.

=====================================

एनपीएस योजनावर चर्चा

जळगाव : एन.मुक्टो संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची भेट घेऊन एनपीएस योजनेवर चर्चा केली. यावेळी संघटनेचे अध्‍यक्ष डॉ. अनिल पाटील, जिल्हाध्‍यक्ष प्रा. नितीन बाविस्कर यांची उपस्थिती होती. २०१९ पर्यंतचे सर्व हिशेब पूर्ण करण्यात आलेले आहेत. मात्र, महाविद्यालयांना रजिस्टर तयार करण्‍याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, बहुतांश महाविद्यालयांनी तसे केले नसल्याचे सहसंचालकांनी शिष्टमंडळाला सांगितले.