शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. बी. व्ही. पवारांकडे प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार - १६ सीटीआर २४ प्रभारी कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी - १६ सीटीआर ...

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार - १६ सीटीआर २४

प्रभारी कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी - १६ सीटीआर २३

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा. बी. व्ही. पवार यांची, तर प्रभारी कुलसचिव म्हणून प्रा. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनी सोमवारी दुपारी आपला पदभार स्वीकारला.

प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी ही नियुक्ती केली आहे. प्रा. बी. व्ही. पवार हे १८ नोव्हेंबर, २०१९ पासून प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत होते. सोमवारी त्यांची प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली़ विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ३२ वर्षांपासून त्यांचा अध्यापन व संशोधन क्षेत्रात अनुभव आहे. त्यांचे १९७ संशोधन पेपर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे, तर नऊ विद्यार्थी सध्या संशोधन करीत आहेत. विविध संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले असून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर (अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, संशोधन समिती) त्यांनी काम केलेले आहे. इतर विद्यापीठांच्या विविध समित्यांवरदेखील प्रा. पवार यांनी काम केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्वायत्त समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. शैक्षणिक आणि प्रशासन यावर प्रा. पवार यांची अचूक पकड आहे. सोमवारी प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

यापूर्वी अधिष्ठाता म्हणून पाहिले कामकाज

प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्त झालेले प्रा. ए. बी. चौधरी हे १९९९ पासून विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेत कार्यरत आहेत. यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी दीड वर्ष काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी दोन वेळा प्रभारी कुलसचिव म्हणून काम केले आहे. व्यवस्थापन परिषद सदस्यपदीदेखील त्यांनी काम केले आहे. जैवशास्त्र प्रशाळेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ते विभागप्रमुख म्हणून राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून, पाच विद्यार्थ्यांनी प्रबंध सादर केले आहेत. प्रा. बी. व्ही. पवार यांच्याकडून त्यांनी प्रभारी कुलसचिवपदाची सूत्रे स्वीकारली. या छोटेखानी समारंभास व्य. प. सदस्य दिलीप पाटील, प्रा. एल. पी.देशमुख, प्रा. मोहन पावरा, दीपक पाटील व अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या जीआरला केराची टोपली

कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा सेवाज्येष्ठता यादीनुसार नॉन टिचिंग स्टाफमधील व्यक्तीला देणे अपेक्षित होते; परंतु तसे न करता ज्यांच्यावर संशोधन चौर्यचा आरोप आहे, त्यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्यापेक्षा अधिक ज्येष्ठ व्यक्ती आहे, जे नियुक्तीस पात्र आहे. त्यामुळे शासनाच्या जीआरला केराची टोपली दाखविणाऱ्या विद्यापीठाने त्या पदाला उचित जो व्यक्ती आहे, त्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड. कुणाल पवार यांनी केली आहे.