शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्यांसाठी नोंदणी फी वाढीचा प्रस्ताव

By admin | Updated: January 5, 2016 01:03 IST

धुळे : महापालिका क्षेत्रातील मोठय़ा दवाखान्यांना आकारण्यात येणा:या नोंदणी व नूतनीकरण फीमध्ये घसघशीत वाढ प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेकडे पाठविला आह़े

धुळे : महापालिका क्षेत्रातील मोठय़ा दवाखान्यांना आकारण्यात येणा:या नोंदणी व नूतनीकरण फीमध्ये घसघशीत वाढ करण्याबरोबरच लहान दवाखाने, पॅथॉलॉजिकल क्लिनिक, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक तसेच होमिओपॅथी दवाखान्यांनादेखील नोंदणी फी आकारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेकडे पाठविला आह़े त्यामुळे आरोग्य विभागाचे दोन स्वतंत्र विषय महासभेत चर्चेसाठी येणार आहेत़

दवाखान्यांवर होती मेहेरनजर

शहरातील 170 मोठय़ा दवाखान्यांची मनपाकडे नोंदणी आह़े परंतु आतार्पयत मनपाने या दवाखान्यांवर मेहेरनजर दाखविल्याने त्यांना दररोज 0़27 पैसे (1 ते 9 खाटांर्पयत), 0़67 पैसे (10 ते 50 खाटांर्पयत), आणि 2़6 रुपये (50 खाटांपुढील) प्रतीदिनप्रमाणे नोंदणी व नूतनीकरण फी आकारण्यात येत होती़ त्यामुळे सुविधायुक्त, प्रथितयश दवाखान्यांना दरवर्षी अनुक्रमे केवळ 100, 250 व 1 हजार रुपयांर्पयत शुल्क आकारणी केली जात होती़ त्यामुळे या शुल्कात वाढ होणे आवश्यक असल्याने त्याबाबत हालचाली सुरू होत्या़

त्यानुसार आरोग्य विभागाने महासभेत हा विषय पाठविला असून त्यात पुढीलप्रमाणे वाढ सुचविली आहे- 15 रुपये (1 ते 9 खाटांर्पयत), 20 रुपये (10 ते 50 खाटांर्पयत) आणि 25 रुपये (50 खाटांपुढील) प्रतीदिऩ अशी वाढ मनपाने सुचविली असून त्यामुळे या दवाखान्यांना प्रती वर्षी अनुक्रमे पाच हजार 500, सात हजार 500 व 10 हजार इतकी नोंदणी व नूतनीकरण फी आकारणी प्रस्तावित आह़े याबाबत महासभेत चर्चा होणार असून चर्चेअंती त्यावर निर्णय घेतला जाणार आह़े ही वाढ झाल्यास मनपाचे उत्पन्न वाढणार आह़े

लहान दवाखानेही घेणार ‘रेकॉर्ड’वर

मुंबई नर्सिग अॅक्ट 1949 व सुधारित 2006 नुसार नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणा:या डॉक्टरांच्या दवाखान्यांच्या नूतनीकरणासंदर्भात मनपाने नाशिक मनपाकडून मार्गदर्शन मागविले होत़े मनपा नाशिक कार्यक्षेत्रात मुंबई शुश्रूषागृहे अधिनियम 1949 व सुधारित 2006 अंतर्गत मनपा हद्दीतील रुग्णालये, क्लिनिक, पॅथॉलॉजिकल लॅबेरोटरीज, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक तसेच होमिओपॅथी दवाखाने यांची नोंदणी केली जाते, असे नमूद आह़े

सद्य:स्थितीत धुळे मनपाकडे कार्यक्षेत्रात केवळ ज्या रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात येते, अशाच 170 दवाखान्यांची नोंद आह़े मात्र नाशिक मनपा वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शन पत्रात नमूद केल्याप्रमाणे धुळे मनपा कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, पॅथॉलॉजिकल लॅबेरोटरीज, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक व होमिओपॅथी दवाखाने यांना फी लागू केल्यास मनपाच्या उत्पन्नात वाढ होऊ शकत़े मुंबई नर्सिग होम अॅक्ट 1949 मधील तरतूद 2(4) नुसार ज्या ठिकाणी आजारी व्यक्तीला वैद्यकीय सेवा दिली जाते, अशा सर्व ठिकाणांना रुग्णालय किंवा शुश्रूषागृह म्हटले पाहिजे, असे नमूद करण्यात आले आह़े त्यानुसार धुळे मनपातही सर्व रुग्णालये, क्लिनिक, पॅथॉलॉजिकल लॅबेरोटरीज, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक व होमिओपॅथी दवाखाने यांची नोंदणी आवश्यक असून त्यांच्याकडून या नियमातील तरतुदीनुसार प्रती वर्ष 500 रुपये फी वसूल करण्यात यावी, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेपुढे ठेवला आह़े आतार्पयत वरीलपैकी कोणत्याही दवाखान्याला तसेच आरोग्य सुविधा पुरविणा:या शुश्रूषागृहांची नोंद मनपाकडे नव्हती, त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत होत़े सदर दवाखान्यांमधील निर्माण होणा:या जैविक घनकच:यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी उक्त दवाखान्यांची नोंदणी आवश्यक आह़े