शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पुन्हा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:23 IST

पिकांचे नुकसान : काही भागात जोरदार तर काही ठिकाणी लावली तुरळक हजेरी

जळगाव : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसा अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. बुधवारी रात्री पडलेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर लगेचच पावसाने कमी- अधिक प्रमाणात पुन्हा हजेरी लावत शेतकऱ्यांचे थोड्या-फार प्रमाणात नुकसान केले आहे.काही भागात हलक्या सरी कोसळल्याधरणगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, तसेच पाचोºयासह सामनेर येथे व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. दिवसभर आभ्राच्छादीत वातावरण होते. यामुळे पाऊस पडेल की काय, असो वाटत होते. हा पाऊस गहू, हरभरा व इतर पिकांसाठी हानीकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.चाळीसगाव परिसरात जोरदार सलामीअवकाळी पावसाने परिसरात शुक्रवारी पहाटे व सकाळी पावणे नऊ वाजता पुन्हाजोरदार सलामी दिली. मात्र कृषी विभागाकडे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही.गेल्या तीन ते चार दिवसांपासून चाळीसगाव परिसरात ढगाळ हवामान आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ३० मिनिटे पाऊस झाला. सकाळी पुन्हा नऊ वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जवळपास ४५ मि. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.दरम्यान वाघडू ता चाळीसगाव परिसरात गहू , हरभरा, मका, बाजरी, ज्वारी ही प्रमुख पिके कापणीवर आलेली असताना शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.उंबरखेडला गहू, बाजरी, मका, हरभरा जमीनदोस्तउंबरखेड ता.चाळीसगाव : येथे रोजी सायंकाळी तासभर आणि २८ रोजी सकाळी चार वाजता दीड तास विजांच्या कडकडाटात व वादळी वाºयासह जोरदार पावसाने गहू , बाजरी, मका, ज्वारीचे उभे पीक आडवे झाल्याने काढणीवर आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पीक आडवे झाल्यामुळे काढणीचे काम जिकिरीचे झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.यावल तालुक्यात गहू आणि कांद्याचे नुकसानयावल शहर व परीसरात गुरूवारी रात्री व शुक्रवारी दुपारी कमी-अधिक प्रमाणात पाउस झाला आहे. या पावसाने गहु, हरभरा, व कांद्याचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे शेतक-यांमध्ये बोलले जात आहे.तालुक्यात गुरूवारी रात्री सौखेडा, दहीगाव परीसरात तर शुक्रवारीही तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.मात्र याबाबत येथील महसुल प्रशासनाकडे कोणतीही नुकसानीची नोद नाही.भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानभडगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडाटात अर्धा ते पाउणतास कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामळे गहु, हरभरा, मका आदी पिकांची कापणी करुन ठेवल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हा माल खराब झाला आहे. भातखंडे, गुढे आदी ठिकाणीही अनेक शेतकºयांना फटका बसला आहे.