शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व वीज दुरुस्ती कामांना सुरुवात होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

सध्या मधून-मधून होणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी वीज तारांमध्ये अडकलेले ...

सध्या मधून-मधून होणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स, बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो.

याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे अपेक्षित आहे. वीज रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे. रोहित्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करणे. फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, वाहिन्यांचे खराब झालेले लाइटनिंग अरेस्टर बदलणे, भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदलणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, जळालेल्या-टलेल्या वायर बदलणे आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धातच केली जावीत यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी सूचना केली होती.

ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार दाखल

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा, हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी मान्सूनपूर्व कामे महावितरणने कोणत्या अधिकृत एजन्सीला काम दिले आहे, अशी विचारणा केली असता अधिकारी वर्गाने उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली म्हणून शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे.

दरवर्षीप्रमाणे भुसावळ शहरात मान्सूनपूर्व कामांची सुरुवात जून महिन्यात केली जाते, असे चित्र आहे.