दरवर्षाप्रमाणे यंदाही महावितरणतर्फे शहरातील सर्व गणेश मंडळांना अधिकृतपणे विज घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यांना घरगुती प्रमाणे विजदर आकारण्यात येणार आहेत. विज जोडणीसाठी महावितरणचे कर्मचारी मंडळांना मदत करित असून, सुरक्षेबाबत मार्गदर्शंनही करित आहेत. दरम्यान, दरवर्षी महावितरणतर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विजेची चोरी पकडण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात येते. मात्र, यंदा पथक नियुक्त न करता, शहरातील विविध ठिकाणच्या शाखा अभियत्यांना त्या-त्या मंडळांच्या ठिकाणी जाऊन अधिकृतपणे विज जोडणी घेतली आहे की नाही, याची पाहणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. तर ज्या ठिकाणी विज चोरीचे प्रकार आढळून येतील, त्या ठिकाणी कारवाईचे अधिकारही शाखा अभियंत्यांना दिले आहेत.
इन्फो :
२४ तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार
गणेशोत्सवात कुठल्याही प्रकाराचा तांत्रिक बिघाड उद्भवल्यास, तात्काळ मदत व्हावी, यासाठी महावितरणतर्फे २४ तास महावितरणचा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. गणेश मंडळांनी १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.