शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासांपासून खंडित ...

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला. यामुळे अंधारात चाचपडत असलेल्या निम्मे भुसावळवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महामार्गाचे काम सुरू असून खेडी १३२ उपकेंद्रावरून तापीनगर केंद्राला वीज जोडणी करणाऱ्या अंडर ग्राउंड ३३ के.व्ही. टेबल किट २३ रोजी सकाळी अकराला जळाली. याचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर झाला. यामुळे अर्धे भुसावळकर हे अंधारात होते.

दुरुस्तीसाठी जळगावहून विशेष पथक

दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात आल्यानंतर अथक परिश्रम केल्याने १७७ मीटर ३३ के.व्ही.ची नवीन केबल टाकल्यानंतर अखेर २४ रोजी दुपारी दुपारच्या सुमारास गेल्या २४ तासांपासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत झाला.

तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी

दरम्यान, खंडित पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत करण्यासाठी साकेगाववरून वीज जोडणी करण्यात आली होती. विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर. घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमनसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जळालेली केबल बदलण्यासाठी घटनास्थळी युद्धपातळीवर कार्य करीत होता. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड

अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने अर्धे भुसावळ शहर अंधारात बुडाले होते. रेल्वे रुळाकडील उत्तरेकडचा संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकडून सातत्याने वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल? याबाबत विचारणा केली जात होती. शांतीनगर, तापी नगर, जुना सातारा गरुड प्लॉट, म्युनिसिपल पार्क, जळगाव रोड, यावल रोड, मामाजी टॉकीज रोड तसेच तसेच शहरातील अनेक भागांमध्ये बत्ती गूल झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.

दुष्काळात तेरावा महिना

शहरात तापी पात्रामध्ये मुबलक पाणी असूनसुद्धा शहरवासीयांचा घसा कोरडाच आहे. कधी जीर्ण जलवाहिनी लिकेज होते, तर कधी ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड होतो, तर कधी महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात नको त्या ठिकाणी जलवाहिनी फुटते. अशा अनेक कारणांमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा रोटेशननुसार एक ते दोन दिवस पुढे टाकला जातो. यातच दुष्काळात तेरावा महिना वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम सरळ पाणीपुरवठ्यावर झाल्यामुळे ज्या भागात बुधवारी सकाळी रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार होता. तो आता पुढे ढकलला गेला आहे. तसेच येणारे पाणीसुद्धा गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे झाले हाल

लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हते. आता हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. मात्र ज्या व्यावसायिकांचे व्यवसाय विद्युत उपकरणावर अवलंबून असतात अशा व्यावसायिकांना बुधवारपासून मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. नागरिकांच्या घेतलेल्या ऑर्डरी वेळेवर देऊ न शकल्याने अनेकांशी तू तू मै मैसुद्धा झाले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर कालपासून हातावर हात घेऊन बसलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला गती मिळाली.

विद्यार्थ्यांचे झाले हाल

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अभ्यासाला बसलेले अनेक विद्यार्थी अंधारामुळे अभ्यास करू शकले नाही. तसेच जे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत होते वीज नसल्यामुळे मोबाइल चार्ज झाल्याने त्यांनाही ऑनलाइन अभ्यास करता आला नाही.

३३ के.व्ही. केबल किट जळाली होती, ती नवीन टाकली. नक्की दोष कुठे आहे ते शोधायला वेळ गेला. नंतर जळगावहून नवीन किट आणल्यानंतर संपूर्ण शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यापूर्वी साकेगाव फिडरवरून ज्या ठिकाणी शक्य झाले त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

-प्रदीप घोरूडे, कार्यकारी अभियंता, विद्युत वितरण कंपनी कार्यालय, भुसावळ

२४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. लहान मुलांचा अभ्यास बुडाला. याशिवाय विद्युत उपकरणावर अवलंबून असलेला व्यवसायही होऊ शकला नाही. तसेच पाणीपुरवठा न झाल्यामुळे हाल झाले, ते वेगळेच.

-अविनाश गवळी, व्यावसायिक, भुसावळ.