शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहाराबाबत टपाल विभाग उदासीन

By admin | Updated: January 4, 2017 22:38 IST

टपाल कार्यालय नागरिक आणि कर्मचाºयांचे पी.एल.आय, आर.डी. अशा इतर योजनांचे हप्ते धनादेशाद्वारे घेण्यास नकार देत आहे.

ंतळोदा : केंद्र सरकार एकीकडे कॅशलेस व्यवहारावर भर देऊन जनतेमध्ये जनजागृती करीत आहे, तर दुसरीकडे केंद्र शासनाच्याच परिक्षेत्रात येणारे टपाल कार्यालय नागरिक आणि कर्मचाºयांचे पी.एल.आय, आर.डी. अशा इतर योजनांचे हप्ते धनादेशाद्वारे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे नागरिकांना हप्ते भरण्यास मोठ्या प्रमाणात अडचणीना तोंड द्यावे लागत आहे़ त्यामुळे शासनाने टपाल विभागाच्या मनमानी कारभाराला  आवर घलून सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.विविध विभागांच्या शासकीय कर्मचाºयांबरोबरच नागरिकांनी टपाल कार्यालयाकडून आर.डी., टपाल जीवन विमा, राष्टÑीय बचत प्रमाणपत्रे व इतर असे वेगवेगळे बचत खाते उघडले आहे. साहजिकच खातेधारक रोखीने दर महिन्याला हप्त्यांची रक्कम येथील टपाल कार्यालयात भरत असतात. तथापि ८ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने हजार व ५०० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरिकांना पन्नास दिवसानंतरही आजपावेतो पुरेशी रक्कम मिळत नाही. पैशांसाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे़ असे विदारक चित्र असताना येथील टपाल कार्यालय, नागरिक आणि कर्मचाºयांना बचत खात्याचे हप्ते भरण्यासाठी रोकडची मागणी  करीत असल्याने नागरिकांना  याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे़ दरम्यान, कर्मचारी हप्ते धनादेश देतात तेव्हा धनादेश स्वीकारण्यास  नकार देत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. टपाल विभागाच्या अशा मनमानी धोरणाबाबत कर्मचाºयांचे हप्ते पैशांअभावी थकले असल्याने  परिणामी त्यांना नाहक दंडदेखील भरावा लागत आहे. वास्तविक केंद्र शासन चलन वाचविण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर मोठा भर देत आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कॅशलेस व्यवहार करावा यासाठी जनजागृतीही करीत आहे. परंतु केंद्र शासनाचेच असलेले टपाल कार्यालय कॅशलेस व्यवहाराविषयी उदासीन धोरण घेत असल्याने नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे़  राष्टÑीयकृत बँकांमध्ये टपाल कार्यालयाचे खाते नसल्यामुळे धनादेश स्वीकारता येत नसल्याचे म्हटले जात असले तरी टपाल विभागाच्या या मनमानी धोरणावर केंद्र शासनाने अंकुश ठेवून विविध बचत खात्यांचे हप्ते धनादेशाद्वारे स्वीकारण्यास सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, टपाल अधिकाºयांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला़     (तालुका प्रतिनिधी)

राष्ट्रीयकृत बँकांकडे टपाल कार्यालयाचे खाते नाही, त्यामुळे पी़एल़आय़ व इतर बचत खात्यांच्या रकमेचे हप्ते रोखीने घेण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत़    -हर्षल डोंगरे, पोस्टमास्तर