शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाजाचा व्यवसाय धोक्यात?

By admin | Updated: January 19, 2016 00:55 IST

महसूल विभागाकडून अनेकांकडून कर वसूल केला जात आह़े यामुळे कुंभार समाजाचा परंपरागत व्यवसाय धोक्यात आला आह़े

धरणगाव : शासनाने परंपरागत विटा, मडकी, मातीची भांडी तयार करणा:या कुंभार समाजाला वर्षभरात 500 ब्रास माती उत्खनन करण्यास स्वामित्व धन देण्याची गरज नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आह़े मात्र महसूल विभागाकडून अनेकांकडून कर वसूल केला जात आह़े यामुळे कुंभार समाजाचा परंपरागत व्यवसाय धोक्यात आला आह़े

याबाबत जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या वतीने महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देण्यात आले असून समस्येचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आह़े

असे आहे शासनाचे परिपत्रक?

महसूल आणि वनविभागाचे अपर मुख्य सचिव यांनी 21 जुलै 2014 रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, तहसीलदारांच्या लेखी पूर्वपरवानगीने व कोणतीही फी किंवा स्वामित्वधन न देता पिढीजात कुंभाराच्या कुटुंबास विटा व इतर मातीच्या वस्तू तयार करण्यास त्याच्या व्यवसायाच्या प्रयोजनासाठी 500 ब्रासर्पयत माती काढता येईल. मात्र त्याच्यापेक्षा अधिक माती वाहतूक केल्यास गौण खनिज कायद्यानुसार (स्वामिधन) महसूल आकारण्यात येईल.

हा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील़

जागेचीही अवाजवी भाडे आकारणी

ज्या जागेवर कुंभार समाज विटांची भट्टी उभारतात त्याचे शासकीय नियमानुसार 60 रुपये आर. प्रमाणे जागा भाडे ठरविण्यात आले आहे. मात्र तो दर न लावता अवाजवी भाडे दर आकारणी केली जात असल्याची कुंभार समाजाची तक्रार आहे.

महसूल वसुली सक्तीची

शासनाच्या निर्णयाला न मानता जिल्ह्यात धरणगावसह काही तालुक्यात कुंभार समाजाकडून सक्तीची महसूल वसुली केली जात आहे. धरणगाव तहसीलदार शशिकांत खैरनार यांनी 20 हजार रुपये भरल्याशिवाय माती वाहतूक करू देऊ नये, असे फर्मान कर्मचा:यांना काढल्याने धरणगाव तालुक्यातील कुंभार समाज हैराण झाला आहे. जिल्ह्यात याला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.

महसूलमंत्र्यांना निवेदन

या संदर्भात कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष शेखर कापडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुंभार, सचिव सखाराम मोरे, बनलाल कुंभार, देवीदास कुंभार, मंगल कुंभार आदींनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ठोस न्याय मागितला आहे. (वार्ताहर)