शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भोळे यांच्या लेटर पॅडवरून राजकीय गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेले संशयित सूरज झवर यांच्या फ्लॅटमध्ये आमदार सुरेश भोळे यांचे कोरे लेटर पॅड सापडल्याच्या ...

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेले संशयित सूरज झवर यांच्या फ्लॅटमध्ये आमदार सुरेश भोळे यांचे कोरे लेटर पॅड सापडल्याच्या तक्रारीवरून चांगलाच राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी तक्रार का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत असताना हे लेटर पॅड बनावट असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेले संशयित सूरज झवर यांच्या पुणे येथील फ्लॅटमध्ये आमदार भोळे यांचे लेटर पॅड सापडल्याने जोरदार चर्चा सुरू झाली. सूरज झवर याला २२ जानेवारी रोजी जळगावातून अटक केल्यानंतर तो पुण्यात कोठडीत आहे. यादरम्यान पोलीस माहिती एकत्रित करीत असताना झवर याच्या फ्लॅटमध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांसह आमदार भोळे यांचे कोरे लेटर पॅड सापडले. यापूर्वी माजी मंत्री गिरीश महाजन यांचेही लेटर पॅड व सरकारी शिक्के झवर यांच्याकडे सापडले होते. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आता पुन्हा आमदार भोळे यांचे लेटर पॅड सापडल्याने राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

लेटर पॅड कोणालाही देत नाही

या प्रकारानंतर भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी म्हटले आहे की, बीएचआर प्रकरणाशी आमदार सुरेश भोळे यांचा काहीही संबंध नाही. झवर यांच्या कार्यालयात सापडलेले आमदार भोळे यांचे लेटर पॅड बनावट आहे. असे कोणत्याही प्रकारचे कोरे लेटर पॅड आमदार कार्यालयाकडून अथवा भाजप कार्यालयाकडून कोणत्याही व्यक्तीस अथवा संस्थेस दिले जात नाही. आमदार कार्यालयाकडून लेटर पॅडवर मजकूर छापून त्याची आमदार कार्यालयातील रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय कोणालाही दिले जात नाही, असे साखरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात यापूर्वीसुद्धा सरकारी शिक्के आढळून आलेले आहेत. सरकारी शिक्के बनावट बनवू शकतात, तेथे आमदारांचे बनावट लेटर पॅड बनवणे सहज शक्य आहे, असेही साखरे यांचे म्हणणे आहे.

——————-

सूरज झवर यांच्याकडे सापडलेले आपल्या नावाचे लेटर पॅड बनावट आहे. आपण ते कोणाला दिलेले नाही. ते बनावटच असल्याने व आपले नसल्याने याविषयी तक्रार देण्याचा प्रश्न येत नाही.

- आमदार सुरेश भोळे