शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

न्यायालयात वडिलांकडे बोट दाखवत साडेतीन वर्षाची मुलगी म्हणाली यांनीच मम्मीला मारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पक्षकार, साक्षीदार, वकील व इतर लोकांच्या गर्दीने फुल्ल भरलेल्या न्यायालयात सात वर्षाच्या मुलीने दिलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पक्षकार, साक्षीदार, वकील व इतर लोकांच्या गर्दीने फुल्ल भरलेल्या न्यायालयात सात वर्षाच्या मुलीने दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्याने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पप्पू रतन पवार (३१ विवेकानंद नगर तांडा, पाचोरा) असे आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांनी बुधवारी हा निकाल दिला.

पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे पप्पू रतन पवार हा त्याची मयत पत्नी कस्तुराबाई (३०), मुलगी गौरी (७ वर्ष), भाग्यश्री (३.५ वर्ष)व खुशी (१.५ वर्ष) अशा तीन मुलींसह राहत होता. पप्पू पवार हा पाचोरा येथेच एका हॉटेलवर कामाला होता. त्याला दारू पिण्याचेसुद्धा व्यसन होते. ९ जून २०१९ रोजी रात्री पप्पू याने तुला मुलीच होतात असे म्हणत मद्याच्या नशेत पत्नीशी भांडण केले. या भांडणात लाकडी दांडा तिच्या डोक्यात टाकला. यात गंभीर जखमी झालेल्या कस्‍तुराबाई यांना शेजारी राहणाऱ्या भाऊ व वहिनीने पाचोरा येथील रुग्णालयात नेले, त्याठिकाणी तिला मयत घोषित करण्यात आले.

दरम्यान, या घटनेबाबत कस्तुराबाईची आई पद्मबाई सखाराम राठोड (६० रा.आनंद नगर तांडा, ता.एरंडोल) हिने पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून पप्पू पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. १० जून रोजी त्याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी दोषारोप दाखल केले.

दोन न्यायाधीशांसमोर चालला खटला

हा खटला सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्यासमोर चालला. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी त्यांच्यासमोर आठ साक्षीदार तपासले. नंतर त्यांची बदली झाली. त्यातही कोरोनाच्या निर्बंधामुळे खटला पुढे चालू शकला नव्हता. डिसेंबर २० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून पुरावा ठेवण्याचे काम पूर्ण केले. या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी गौरी हिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर सांगितला. तुझ्या वडिलांना कोणी मारले, असे ढाके यांनी विचारले असता तिने न्यायालयात असलेल्या तिच्या वडिलांकडे बोट दाखवले. या व्यतिरिक्त स्वतः फिर्यादी पद्मबाई राठोड,डॉ.नीलेश देवराज, पंच साक्षीदार व उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्त्वाच्या झाल्या. या खटल्यात दुसऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलीकडूनही घटना जाणून घेण्यात आली. न्यायालयाने पती पप्पू रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान गुन्हा घडल्यापासून आरोपी पती पप्पू पवार हा कारागृहातच होता. न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सवर सुनावणी घेऊन शिक्षा ठोठावली.

एकाच आठवड्यात दोन शिक्षा

जिल्हा सत्र न्यायालयात एकाच आठवड्यात जन्मठेपेच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या. या दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी पत्नीचा खून केलेला होता. गेल्या आठवड्यात सुनावण्यात आलेल्या शिक्षेत सरकारी वकील विद्या राजपूत यांच्या खून प्रकरणात पती डॉक्टर भरत पाटील याला जन्मठेप तर सासरे लालसिंग पाटील याला चार वर्षाची कैद अशी शिक्षा आली होती.