शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 20:58 IST

पारोळा : शहरात ७ रोजी अचानक प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम राबविण्यात आली. मग काय, कारवाईच्या भीतीने बाजारपेठेतील सर्व दुकाने ...

पारोळा : शहरात ७ रोजी अचानक प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम राबविण्यात आली. मग काय, कारवाईच्या भीतीने बाजारपेठेतील सर्व दुकाने क्षणात बंद झाली. बाजारपेठेत शुकशुकाट झाला. शेकडो दुकानदार व व्यावसायिक हे थेट नागरपालिकेवर धडकले आणि अचानक मोहीमेबाबत रोष व्यक्त केला.शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्लॅस्टिक बंदीची मोहीम अचानकपणे अभियंता विनोद इन्शुलकर यांनी राबविली. नगरपालिकेच्या १० ते १२ कर्मचा-यांचे पथक कारवाईसाठी निघाले. ज्या दुकानात प्लॅस्टिक कॅरीबॅग आढळून आली त्यांना जागेवर पाच हजार रुपयांचा दंड आकारून वसूल करण्यात आला. तर काहींना दंडाची पावती देण्यात आली. यामुळे अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे दुकानदारांमध्ये घबराट निर्माण झाली. प्रत्येक दुकानदाराकडे कॅरीबॅग असल्याने सर्वांनी कारवाई होण्याच्या भीतीने पटापट दुकाने बंद केली आणि संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट झाला.दुकनदारांनी नगरपालिकेत जाऊन खेळणी साहित्याच्या प्लॅस्टिक वस्तू दाखवत त्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तसेच अनेक प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी शेकडो व्यापारी, छोट-मोठे व्यावसायिक यांनी पालिकेत गर्दी केली होती. नगरसेवक मनिष पाटील यांनी कार्यलयीन अधिक्षिका यांची भेट घेत सर्वांना नोटिसा व वेळ द्या, मग कारवाई करावी, असे सांगितल्यावर ही कारवाई थंडावली. व्यापारी, दुकानदारांना समजविण्यात आले. त्यानंतर दुकाने पुन्हा सुरू झाली.