शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

परवेजने अनेक मुलींना फसविल्याचा संशय

By admin | Updated: July 7, 2017 02:04 IST

कोठडीत वाढ : फौजदार पिता पोलिसांना सापडेना खंडपीठात अटकपूर्वसाठी जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाºया परवेज शेख रईस शेख याने आणखी अनेक मुलींना फसविल्याचा संशय आहे, त्यामुळे त्याची चौकशी अपूर्ण आहे तसेच त्याचा फौजदार पिता पोलिसांना अद्याप सापडलेला नसल्याने सरकार पक्ष व पीडित मुलीच्या वकिलांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडल्याने परवेजच्या कोठडीत आणखी दोन दिवसाची वाढ करण्यात आली.परवेज शेख याने शहरातील एका २४ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्ष बलात्कार केला तर त्याचा फौजदार पिता रईस शेख याने पीडित तरुणीला धमकी देत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर सायंकाळी परवेज शेख याला अटक करण्यात आली होती. न्या.प्रतिभा पाटील यांनी त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्याला न्या.के.एस.कुळकर्णी            यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनीही मांडले प्रभावी मुद्देपोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी परवेजला न्या.के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले. परवेज याने पीडित तरुणीसह आणखी काही मुलींना फसविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करावयाचा आहे.तसेच त्याच्या  दोन साथीदारांचीही चौकशी करणे बाकी आहे. त्यांच्याबाबतची माहिती परवेजकडूनच मिळू शकते. त्याचा पिता रईस शेख याला अटक झालेली नाही असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर पीडित तरुणीचे वकील पंकज अत्रे यांनीही पोलिसांच्याच मुद्याचा आधार घेत परवेजला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. बचाव पक्षाचे वकील सागर चित्रे यांनी परवेजच्या पोलीस कोठडीची गरज नाही. त्याची वैद्यकीय तपासणी झालेली आहे.त्याच्या पित्याने खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगून कोठडीच्या मागणीला विरोध केला. न्यायालयाने दोन्हीकडील युक्तीवाद व पोलिसांचे म्हणणे ऐकून परवेजच्या पोलीस कोठडीत ८ जुलैपर्यंत वाढ केली.