शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीशी लग्न करता यावे म्हणून पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:17 IST

जळगाव : लग्न झालेले असतानाही पतीने परस्रीशी संबंध ठेवले. संबंधित महिलेशी दुसरे लग्न करता यावे म्हणून पतीने पत्नीचा ...

जळगाव : लग्न झालेले असतानाही पतीने परस्रीशी संबंध ठेवले. संबंधित महिलेशी दुसरे लग्न करता यावे म्हणून पतीने पत्नीचा शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून गुरुवारी पती अनिल आनंदा बागूल रा. ब्राम्हणे ता. एरंडोल व ती महिला या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील मनीषा हिचा २२ मे २०१५ रोजी एरंडोल तालुक्यातील अनिल आनंदा बागूल याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुलेही झाली. अनिल हा कंपनीत नोकरीला आहे. २०१६ मध्ये एरंडोल राहत असताना पती अनिल याची एका महिलेशी ओळख झाली. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढत अनिल याने तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान एक ते दोन वेळा तिला घरीही घेऊन आला. या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यावर मनीषा हिने पती अनिल यास विचारले असता, अनिलने पत्नी मनीषा हिस शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच यानंतर वारंवार घटस्फोट देण्याची धमकी देऊन मारहाण करायला लागला. यादरम्यान काळात पती अनिल याने मनीषा हिच्या माहेरून १ लाख रुपये घेतले, लग्नात मिळालेले ६ तोळे सोनेही अनिलकडे आहेत. तसेच अनिल हा मनीषाच्या माहेरच्यांकडे वारंवार पैशाची मागणी करून त्यावरून मनीषा हीस मारहाण करून तिचा मानसिक छळ करत होता. एके दिवशी अनिलने पत्नी मनीषा हीस मला दुसरे लग्न करायचे असून फारकत देऊन टाक, असे सांगत मारहाण केली. यात तिच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. अशाप्रकारे पतीचा छळ तसेच अपमानास्पद व क्रूर वागणूक असह्य झाल्याने मनीषा ही ५ मे २०२० रोजी माहेरी निघून आली व गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.