शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे ही जनतेची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:18 IST

जळगाव : महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही आमची नव्हे तर जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशी टीका माजी ...

जळगाव : महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही आमची नव्हे तर जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जळगावात राज्य सरकारवर केली.

भाजपच्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन हे रविवारी सायंकाळी जळगावात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यावर अतिशय दुर्दैवी वेळ

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटत आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे आज आपण सर्वजण बघत आहोत. जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजप सरकार आल्यास सर्वांना न्याय

राज्यात आता बदल झाला पाहिजे, हे जनतेच्याच मनात आहे. हे सरकार जाऊन भाजप सरकार आले तर सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे राज्यभर दौरा करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सक्षम विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे न्याय देण्याचे काम आम्ही करतोय, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.