अमळनेर : सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी अखेर जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार चेअरमनपदाचा राजीनामा दिला. प्रभारी अध्यक्ष म्हणून सचिन साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.राजेंद्र पवार हे सेवानिवृत्त झाल्याने पतपेढीच्या नियमाप्रमाणे चेअरमनपदी राहू शकत नव्हते. याबाबत जितेंद्र ठाकूर यांनी जिल्हा उपनिबंधकांंकडे तक्रार केली होती. पवार सेवानिवृत्त झाल्याने ते अनाधिकाराने पदावर विराजमान असून त्यांनी स्वत:हून राजिनामा न दिल्यास व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले होत. अखेर पवार यांनीच ३१ आॅगस्ट रोजीच्या मासिक सभेत सभासदांच्या मताचा सन्मान राखत राजीनामा दिला.उपाध्यक्ष सचिन साळुंखे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बैठकीस तुषार पाटील, जे.एस.पाटील, के.यु.बागुल, आर.बी.पाटील, राजेंद्र पाटील, वसुंधरा लांडगे, कविता पाटील, सुलोचना पाटील, हेमराज विसावे, रमेश चव्हाण हे संचालक उपस्थित होत.
पवार यांचा अखेर राजीनामा, प्रभारी अध्यक्षपदी साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 21:05 IST