शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पथराड बनतंय कांदा उत्पादकांचे गाव

By admin | Updated: May 16, 2017 13:18 IST

कांदा लागवडीसाठी एकरी तीने ते चार हजार एवढा मजूरी व बियाणे खर्च येतो.

भगवान मराठे / ऑनलाइन लोकमतपथराड, जि. जळगाव, दि. 16 - कांदा लागवडीसाठी आधी कांदा बी तयार करावे लागते. कांदा रोप साधारण दीड महिन्याचे झाल्यावर लागवड केली जाते. कांदा लागवडीसाठी एकरी तीने ते चार हजार एवढा मजूरी व बियाणे खर्च येतो. मशागतीसाठी एकरी 1900 ते 2000 खर्च येतो. कांदा लागवड झाल्यानंतर एक वेळा 4 ते 5 हजार रुपयांचे रासायनिक खत दिले जाते. काही शेतकरी दोन ते तीन वेळा रासायनिक खते देतात. यामुळे खर्चात वाढ होते व एकूण खर्च 12 ते 15 हजार प्रती हेक्टरी होतो. रोग निवारणासाठी फवारणी करावी लागते. एकरी  8 ते 10 पंप फवारणी करावी लागते. त्याचा खर्च 2 ते अडीच हजार रुपयांर्पयत येतो. यानंतर तणनाशक फवारणीसाठी एकरी हजार रुपये खर्च येतो. कांदा साधारणत: साडेतीन ते चार महिन्यात तयार होतो.  कांदा खांडणीचा खर्च 3800 रुपये येतो. यानंतर कांदा स्वच्छ करून गोण्यांमध्ये भरला जातो. गोण्यांमध्ये कांदा भरण्यासाठी 10 महिला व दोन पुरुष मजूर म्हणून लागल्यास तो एकरी खर्च 2000 रुपये इतका येतो. कांद्याला या वर्षी भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक:याला लागलेल्या मूल्यापेक्षा कमी मोबदला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला साधारणत: एकरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो आहे. आज बाजारात कांदा तीन रुपये किलोने विकला जात असल्याने शेतक:याचा कांद्यासाठी झालेला खर्चही निघत नाही, परंतु पुढच्या आशेने शेतकरी कांदा बी तयार करून त्याची साठवण करीत आहेत. त्यामुळे गावाची वाटचाल  कांदा उत्पादक गाव अशी होऊ लागली आहे. 70 ते 80 शेतकरी करतात लागवड पथराड,  ता. धरणगाव येथील शेतकरी गेल्या काही वर्षापासून कांदा लागवडीवर भर देत आहेत. आता गावातील 70 ते 75 टक्के शेतकरी कांदा लागवड करायला लागले आहेत़ त्यामुळे गावाची ओळख आता कांदा उत्पादक गाव म्हणून होऊ लागली आहे. विशेष म्हणजे  पथराड गावातील बहुतेक शेतकरी  कांद्याचे बी स्वत: च्याच शेतात घेतात़